![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/04/pjimage-2-784x441-380x214.jpg)
रविवारी 2 जून ला मध्य रेल्वे (Central Railway) च्या कसारा (kasara) स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने लोकल गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे कसाऱ्याकडे जाणाऱ्या दोन लोकल्स लागोपाठ रखडल्या आहेत. आज अगोदरच मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉक (Jumbo Block) घेण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत होती त्यात या इंजिनातील बिघाडामुळे प्रवाश्यांना आणखीन हाल सहन करावे लागत आहेत. कसारा जवळ थांबलेल्या गाड्यांमुळे कल्याण (Kalyan), डोंबिवली (Dombivli) स्थानकावर प्रवाश्यांची गर्दी वाढताना पाहायला मिळतेय.
मध्ये रेल्वे मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप साईडच्या धीम्या रेल्वे मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 3. 50 पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी धीम्या मार्गावरील लोकल गाड्या या कल्याण ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येत आहेत. तसेच लोकल ट्रेन ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा स्थानकात थांबत नाहीयेत त्यामुळे प्रमुख स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांची गर्दी झाली आहे. Megablock Updates 2nd June: पश्चिम रेल्वे प्रवाश्यांना नाईट ब्लॉक मुळे दिलासा, मध्य व हार्बर रेल्वे वर मात्र उद्या मेगाब्लॉक
दररोज काही ना काही कारणाने लेट धावणाऱ्या ट्रेनमुळे प्रवाश्यांचा संताप वाढत चालला आहे. या पूर्ण आठवड्यात कधी इंजिन बंद पडल्याने, रुळाला तडा गेल्याने तर कधी सिंगल यंत्रणा बिघडल्याने वारंवार मध्य रेल्वेच्या प्रवाश्यांना समस्यांना तोंड द्यावे लागले होते. दार आठवड्याला रुळांची व तांत्रिक कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेऊन देखील जर आठवडाभर असे बिघाड होणार असतील तर या ब्लॉकचा उपयोगच काय असा प्रश्न संतप्त प्रवाश्यांनी केला आहे.