Megablock Updates 2nd June: पश्चिम रेल्वे प्रवाश्यांना नाईट ब्लॉक मुळे दिलासा, मध्य व हार्बर रेल्वे वर मात्र उद्या मेगाब्लॉक
Mumbai Local (photo credits: Commons.Wikimedia)

रेल्वे रुळाची पाहणी, तपासणी व दुरुस्ती तसेच अन्य कामांसाठी घेण्यात येणाऱ्या ब्लॉकच्या वेळेत प्रवाश्यांची मात्र पंचाईत होते, यावर उपाय म्हणुन पश्चिम रेल्वे (Western Railway Night block)  मार्गावर रविवार ऐवजी आज म्हणजेच 1 जून ला नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे. यानुसार शनिवारी रात्री वसई रोड (Vasai Road0 ते वैतरणा (Vaitarana) अप व डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेऊन मार्गातील कामे करण्यात येतील. त्यामुळे रविवारी कोणताही ब्लॉक नसेल, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले. मध्ये रेल्वेवर (Central railway Sunday Megablock) मात्र उद्या म्हणजेच रविवारी कल्याण (kalyan)  ते ठाणे (Thane) अप धीम्या मार्गावर आणि हार्बर लाईन (Harbour Railway) च्या सीएसएमटी ते चुनाभट्टी (Chunabhatti) , वांद्रे (Bandra) अप व डाऊन मार्गावर ब्लॉक असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

शनिवार १ जून पश्चिम रेल्वे नाईट ब्लॉक

पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार आज म्हणजेच शनिवारी 1 जूनला वसई रोड ते वैतरणा दरम्यान अप तसेच डाऊन जलद मार्गावर नाईट ब्लॉक असणार आहे. यानुसार अप जलद मार्गावर रात्री 11. 50  ते मध्यरात्री 2. 50 पर्यंत तर डाऊन जलद मार्गावर मध्य रात्री 1.30  ते पहाटे 4. 30  पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. रात्रीच्या वेळेत ब्लॉक घेतल्याने प्रश्यांची गैरसोय टाळणार असली तर ब्लॉक दरम्यान या मार्गावरील मेल व एक्सप्रेस गाड्या साधारण पंधरा मिनिट उशिराने धावतील.

 पश्चिम रेल्वे ट्विट 

रविवार 2 जून मध्य व हार्बर रेल्वे ब्लॉक टाईमटेबल

मध्ये रेल्वे मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप सईदच्या धीम्या रेल्वे मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 3. 50  पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी धीम्या मार्गावरील लोकल गाड्या या कल्याण ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील. तसेच ब्लॉकच्या वेळेत लोकल ट्रेन ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा स्थानकात थांबणार नाहीत.

हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी तसेच वांद्रे अप व डाऊन मार्गावर उद्या ब्लॉक घेण्यात येईल. यानुसार अप मार्गावर सकाळी 11. 10 ते दुपारी 3.40 दरम्यान तर डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4. 10  पर्यंत ब्लॉक असणार आहे. या कालावधीत सीएसएमटी, वडाळा ते वांद्रे, गोरेगाव, वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यानच्या अप व डाऊन लोकल गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल सोडण्यात येणार आहे.

मेगाब्लॉक दरम्यान गैरसोय टाळायची असल्यास प्रवाश्यांनी टाईमटेबल नुसार आपली प्रवासाची वेळ ठरवावी.