मुंबई मध्ये डिलाईरोडचा ब्रीज खुला करण्यात आल्यानंतर आता सायन (Sion) वरून धारावी-वांद्रे भागात जाणार जुना रस्ता शनिवार 20 जानेवारी पासून बंद होत आहे. पुनर्बांधणीसाठी हा पूल किमान 2 वर्ष बंद राहणार आहे. त्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. मध्य रेल्वे आणि मुंबई महानगर पालिका हा पूल पुन्हा बांधणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता या भागातून प्रवास करताना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सायन रेल्वेपूलाच्या पुन्हा बांधणीसाठी एकूण 49 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये मध्य रेल्वे 23 कोटी आणि बीएमसी 26 कोटी देणार आहे. आयआयटी मुंबई कडून शहरातील जुन्या पुलांचा आढावा घेतला होता. त्यानंतर या अहवालात सायनच्या पूलामध्ये स्टील गर्डर, आरसीसी स्लॅब धोकादायक स्थितीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते त्यामुळे आता हा पूल नव्याने बांधला जात आहे. सोबतच सीएसएमटी आणि कुर्ला स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईन टाकण्यासाठी अधिक जागा मिळावी यासाठी ब्रिटीशकालीन ROB ची पुनर्बांधणी केली जात आहे.
पुलाचा सध्याचा स्पॅन 27m आहे, एक खांब 13m आणि दुसरा 14m आहे. नवीन पुलाचा एकच स्पॅन 52 मीटर असेल, त्यामुळे मध्य रेल्वेला ट्रॅक टाकण्याचे काम करण्यासाठी पुरेशी जागा मोकळी होईल. पुलाची रुंदी, जी 15 मीटर आहे, ती कायम राहणार आहे. नक्की वाचा: Navi Mumbai Nerul Jetty: मुंबईकरांसाठी खुशखबर! बहुप्रतीक्षित नेरुळ जेट्टी येत्या दोन ते तीन महिन्यांत कार्यान्वित होणार; CIDCO ने दिली माहिती .
सायन ओव्हर ब्रिज बंद केल्यामुळे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खालील रस्ते 'नो पार्किंग’ म्हणून घोषित केले आहेत.
#MTPTrafficUpdates pic.twitter.com/AzirWkNEMY
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) January 19, 2024
दरम्यान या पूलाच्या बांधणीमुळे सायन वरून थेट धारावी- वांद्रे मध्ये जाणारा मार्ग बंद होणार आहे. नागरिकांना आता बीकेसी-चुनाभट्टी कनेक्टर, सायन हॉस्पिटलच्या येथून सुलोचना शेट्टी ब्रीज वरून धारावी कुंभारवाडा मार्गे वांद्रे तून पश्चिम उपनगरामध्ये जाण्याचा पर्याय दिला जाणार आहे. सध्या सायन स्टेशन ब्रीज जवळ वाहनांना वाहतूकीमधील पर्यायी रस्ते सांगण्यासाठी सूचना फलक लावण्याचं काम सुरू आहे.