Mumbai Rain Update: मागील 6 तासात मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस बरसला आहे. तसेच शहरात पुढील 3 ते 4 तास ढगाळ वातावरण राहणार आहे. आज दुपारपासून सुरू झालेल्या पावसाचा ठाणे, पालघर जिल्ह्यातील वाहतूकीवर परिणाम झाला. तसेच पुढील काही तास या परिसरात खराब दृश्यमानता असणार आहे, यासंदर्भात भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर (K S Hosalikar) यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने हजेरी लावलेली आहे. याशिवाय ठाणे तसेच पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. तसेच मंगळवारी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (हेही वाचा -Maharashtra Monsoon Update: सिंधुदुर्ग, गोव्यामध्ये पुढील 2-3 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, मुंबई, ठाण्यात मात्र ढगाळ वातावरण- IMD)
Mumbai,Thane,NM in last 6 hrs.Raining nonstop,steadily; turning yellow marks on map to purple. Will turn Pink soon!
Radar showing total Mumbai overcast with mod intensity of rains likely for 3,4 hrs.Thane Palghar too RF will cont leading to Traffic Jams, wet Rds, poor visibility. pic.twitter.com/XBvTyfuSmx
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 21, 2020
पुढील 4 ते 5 तासात नंदुरबार, धुळे, मुंबई, सिंधूदुर्ग, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच येत्या 24 तासात दक्षिण कोकण, गोवा भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय मुंबईसह ठाणे काही भागात आणि रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळणार शक्यता आहे.