Maharashtra Monsoon Update: सिंधुदुर्ग, गोव्यामध्ये पुढील 2-3 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, मुंबई, ठाण्यात मात्र ढगाळ वातावरण- IMD
Monsoon (Photo Credit: PTI/Representational Image)

हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात दक्षिण कोकण म्हणजेच सिंधुदुर्ग (Sindhudurg), गोव्यात (Goa) पुढील 2-3 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर मुंबई (Mumbai) आणि ठाण्यात (Thane) ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची शक्यता फारच धुसर असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागात देखील ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्रात यंदा ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला असून मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलाव देखील ओसंडून वाहत आहेत. दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर हा जोर हा आता कमी झालेला दिसून ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवायला लागला आहे.

हवामान विभागाने काल दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाण्यात 21 व 22 सप्टेंबरला म्हणजेच सोमवार आणि मंगळवारी मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि कोकणात (Konkan) मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र वातावरणातील बदलामुळे आज मुंबई, ठाण्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असेही सांगण्यात आले होते. Maharashtra Monsoon Update: मुंबईसह ठाणे, कोकणात येत्या 21 आणि 22 सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता- IMD

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले असले तरी त्यामुळे पाणी कपातीचे संकट टळण्याचा अंदाज आहे. तलावक्षेत्रात उत्तम पाऊस झाल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी ही मुख्य धरणे भरली आहेत.