प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

व्यावसायाच्या सुरुवातीलाच आज भारतीय बाजारात शेअर मार्केटने नवा रेकॉर्ड केला आहे. त्यानुसार सेनसेक्स 46 अंकांनी वाढला असून मंगळवारी 410352 चा रेकॉर्ड तोडला आहे. तर निफ्टी काल 12.164 अंकांवर बंद झाला होता. मात्र आज 12, 181 वर स्थिरावला आहे. त्यामुळे सेनसेक्सने पहिल्यांदाच शंभरीचा आकडा पार केला असून निफ्टीच्या आकड्यात सुद्धा भारदस्त उसळली आली आहे.

मंगळवारी बीएसईचा सेनसेक्स 413. 43 अंकांनी उसळून 41,352.17 वर बंद झाला होता. तर NSE चे निफ्टी 111.05 अंकांनी वाढून 21,165.00 वर बंद झाला होता. निफ्टीच्या ज्या स्टॉक मध्ये वेगाने व्यवसाय सुरु झाला त्यामध्ये TECHM (1.81%), टाटा स्टील (1.39%), टीसीएस (1.22%), महिंद्रा अॅन्ड महिंद्रा (0.82%), JSWSTEEL (0.81%), टाटा मोटर्स (0.80%), एचडीएफसी बैंक (0.46%) आणि डॉ. रेड्डी (0.34%) यांची नावे सहभागी आहेत.

ANI Tweet:

हिंदुस्तान लीवर (-1.39%), गेल (-0.75%), एक्सिस बैंक (-0.57%), भारती एयरटेल (-0.53%), आईसीआईसी बैंक (-0.47%), ओएनजीसी (-0.44%), बीपीसीएल (-0.41%), आईओसी (-0.36%) यांचा स्टॉक लाल रंगाच्या निशाणीसह खाली उतरताना दिसून आला.(शेअर बाजार कोसळलं; Sensex पाच महिन्यांतील निच्चांकावर तर US Doller समोर रूपया 72.03)

 सेनसेक्सने 30 ऑक्टोबरला 40 हजाराचा स्तर पार केला होता. तेव्हा सेनसेक्सचा आकडा 40,055.63 वर पोहचला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत सेनसेक्स सातत्याने 40,000 च्या वरच राहिला आहे. या दरम्यान सेनसेक्स पहिल्यांदाच 27 नोव्हेंबरला 41 हजारांवर पोहलचा होता. त्यानंतर पुढील दोन दिवस वेग कायम राहिल्याने बीएसई इंडेक्स 29 नोव्हेंबरला 40,793.81 स्तरावर पोहचला. त्यानंतर आता 13 डिसेंबरला बाजारात 41,009 च्या स्तरावर ट्रेडिंग करण्यात आले.