भारतीय शेअर बाजरमध्ये आज (23 ऑगस्ट) पुन्हा मोठी घसरण पहायला मिळाली आहे. सकाळी शेअर बाजार उघडताच सेंसेक्स (Sensex) 307 अंकांनी कोसळला आहे. शेअर बाजारातील मागील पाच महिन्यांमधील ही मोठी घसरण समजली जात आहे. त्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज रूपयाचे मूल्य देखील घसरले आहे. आज रूपया डॉलरच्या तुलनेत 72.03 इतका खाली घसरला आहे.
शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम सोने बाजारावरही झाला आहे. आज सोन्याचा भावदेखील वाढला आहे. आज सकाळी शेअर बाजार उघडताच सेनेक्स 36472.93 वर उघडला. तर निफ्टी 177.35 ने घसरून 10741.35 वर बंद झाला आहे. काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर मधील तणावग्रस्त शांततेच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स, निफ्टी मध्ये घसरण झाली होती.
ANI Tweet
Indian Rupee at 72.03 versus the US Dollar. pic.twitter.com/bMTygNS524
— ANI (@ANI) August 23, 2019
भारतीय रूपया देखील 26 पैशांनी घसरला असून डॉलर 70 च्या पार गेला आहे. आजची रूपयाची डॉलर समोरील किंमत ही आठ महिन्यातील निच्चांकी आहे. परिणामी सोन्याचा दर 150 रूपयांनी वाढून 38970 रूपये प्रति 10 ग्राम इतका झाला आहे. तर चांदी 60 रूपयांनी वाढून 45100 रूपये प्रति किलो इतकी झाली आहे.