Share Market Updates on 5 August: जम्मू काश्मिरमध्ये तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. रात्री काही नेत्यांना नजरकैदेत ठेवल्यानंतर आता आज सकाळपासून जम्मू आणि काश्मिरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. जम्मू काश्मिरमध्ये राजकीय घडामोडींना आता वेग आल्याने त्याचा परिणाम मुंबईतही दिसला आहे. आज सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीवर त्याचा परिणाम दिसून आला आहे. काश्मिरमधील तणावग्रस्त परिस्थितीमुळे सेन्सेक्स गडगडल्याची माहिती देण्यात आली आहे. आज (5 ऑगस्ट) सेन्सेक्स 500 हून अधिक अंकांनी गडगडला असून 36,678.07 वर पोहचला आहे. तर निफ्टी 175 अंकांनी घसरल्याचं चित्र आहे. उमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती नजरकैदेत; काश्मीरमध्ये कलम 144 लागू
काश्मिरमध्ये शुक्रवारी अमरनाथ यात्रा रद्द करून भाविकांना आणि पर्यटकांना तात्काळ काश्मिर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर सध्या जम्मू काश्मिरमध्ये शाळा, कॉलेज यांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच मोबाईल, लॅन्डलाईन आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहेत.
ANI Tweet
Sensex at 36,678.07, down by 440.15 points. pic.twitter.com/ye0FIHLjEA
— ANI (@ANI) August 5, 2019
आज केंद्रीय मंडळाच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. त्यामध्ये अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा समावेश होता. आज संसदेत सरकार कडून माहिती दिली जाणार आहे.