उमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती नजरकैदेत; काश्मीरमध्ये कलम 144 लागू
Jammu & Kashmir Section 144 Imposed (Photo Credits: ANI)

जम्मू काश्मिर मध्ये अमरनाथचे यात्रेकरू आणि इतर पर्यटकांना तात्काळ काश्मीर सोडण्याचे आदेश दिल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. मध्यरात्रीपासून (5ऑगस्ट) जम्मू काश्मिरमध्ये अनेक घडामोडींना वेग आला आहे. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष उमर अब्दुल्ला  (Omar Abdullah) यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. सोबतच नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या माजी मंत्र्यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.जम्मू मध्ये आज सकाळपासूनच कलम 144 लागू करण्यात आले आहे.

काश्मीरमधील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांना आज सुट्टी देण्यात आली आहे. श्रीनगरमधील सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. श्रीनगर शहर व जिल्ह्यामध्ये जमावबंदीही लागू करण्यात आली आहे.

ANI Tweet

उमर अब्दुल्ला ट्विट

मेहबुबा मुफ्ती ट्विट

काश्मीरला असलेला विशेष दर्जा हटवण्यसाठी काही घडामोडी सुरू असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहे. त्यामुळे जम्मू आणि काश्मिरमध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचं चित्र आहे. राजकीय नेत्यांनी या पार्श्वभूमीवर संयम ठेवण्याचं आवाहन नागरिकांना केले आहे.