Monsoon 2020 | Image used for representational purpose only | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रामध्ये 11 जून दिवशी मान्सूनचं आगमन झाल्यानंतर आता मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक सह कोकणामध्येही दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. आज (18 जून) सकाळपासूनच मुंबई शहरात आभाळ भरून आलं होतं. मागील तासाभरापासून मुसळधार पावसाला देखील सुरूवात झाली आहे. मुंबईच्या अनेक भागात अधून मधून ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसायला सुरूवात झाली आहे. दरम्यान पुढील काही तास मुंबई शहारामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा मुंबई हवामान खात्याने दिला आहे. तसेच पुढील काही आठवडे महाराष्ट्रात पाऊस बरसण्यास पोषक वातावरण असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कालच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार, यंदा जून महिन्यात सरसरीपेक्षा संपूर्ण राज्यात अधिक पाऊस झाला आहे. आजही मुंबई, ठाण्यात धुव्वाधार पाऊस बरसणार आहे. Monsoon 2020 Forecast: गोवा, कोकण सह पश्चिम किनारपट्टीवर पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता: IMD चा अंदाज

K S Hosalikar यांचे ट्वीट

महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे मान्सूनचं आगमन झाले असले तरीही मागील काही दिवसांत मुंबई, ठाणेकरांना दमदार पावसाची प्रतिक्षा होती. मात्र आज अखेर मुंबईत पावसाला चांगला जोर आहे. तो पुढील काही तास राहणार आहे. असा अंदाज मुंबई वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट असल्याने मुंबईकर नागरिकांना विनाकारण पावसात भिजू नये असे आवाहन मुंबई पोलिस, आरोग्य यंत्रणा आणि राज्य सरकार यांच्याकडून करण्यात आलं आहे.