भारतीय हवामान खात्याने (IMD) आज (17 जून) वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या पाच दिवसामध्ये कर्नाटक, गोवा आणि कोकण सह पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. 11 जूनला महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं (Monsoon) आगमन झाल्यानंतर त्याने काही दिवसातच सारं राज्य व्यापलं आहे. अशामध्ये आता येत्या काही दिवसामध्ये ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. 19 ते 21 जून पर्यंत वार्यालाही वेग राहणार आहे.
दरम्यान आज मुंबई हवामान खात्याने महाराष्ट्रात 1 जूनपासून बरसलेल्या पावसाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये राज्यात सर्वत्र अपेक्षेपेक्षा अधिक आणि समाधानकारक पाऊस बरसला आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून कोकणात आणि नाशिकमध्ये धुव्वाधार पाऊस बरसायला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी झरे, धबधबे कोसळायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे निसर्गाचं हे बदललं रूप आल्हाददायक आहे. IMD Monsoon 2020 Forecast: यंदा भारतामध्ये सरासरीच्या 100% पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज.
ANI Tweet
Widespread rainfall activity very likely along the West Coast with isolated heavy to very heavy falls over Coastal Karnataka and Konkan & Goa during next 5 days: IMD
— ANI (@ANI) June 17, 2020
IMD ने यापूर्वी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, साऊथवेस्ट मान्सून येत्या काही दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्येही अधिक तीव्रतेने सक्रिय होणार आहे. त्यामुळे दुष्काळाचा सामना करणार्या महाराष्ट्रातील या भागामध्येही आता पाऊस बसरण्याची शक्यता आहे.