Mumbai Rainfall (PC- ANI)

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि परिसरातून पावसाने दडी मारल्याने नागरिक त्रस्त झाले होते. पाऊस गायब झाल्याने नागरिक उन्हामुळे त्रस्त झाले आहे. मोठ्या ब्रेकनंतर मुंबईत पाऊस परतला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे.यामुळे आता मुंबईकर सुखावले आहे. शनिवारी सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बँटिंग सुरू आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून अधून मधून मुसळधार पाऊस कोसळत आहे. कुर्ला पश्चिमेत सीएसटी परिसरात पावसाचा जोर जास्त असल्यामुळं रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी भरलं आहे. (हेही वाचा - Maharashtra Weather Update: हवामान विभागाकडून विदर्भात पावसाचा यलो अलर्ट, मुंबईत पुढील 48 तास असं राहील वातावरण)

मुंबईत पावसाने हजेरी लावली असून येत्या 48 तासांत राज्यातील बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार असं हवामान खात्याने सांगितलं आहे. यापार्श्वभूमीवर काही भागांना यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. शनिवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. याशिवाय पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील तीन दिवस हलक्या पावसाचा इशारा दिला आहे.

दरम्यान पावसाच्या हजेरीने बळीराजा हा आता सुखावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा हा चिंतेत होता. आता पुन्हा शेतीच्या कामाला त्यांनी सुरुवात केली आहे.