Maharashtra Weather Update: हवामान विभागाकडून विदर्भात पावसाचा यलो अलर्ट, मुंबईत पुढील 48 तास असं राहील वातावरण
Heavy Rain | representative pic- (photo credit -pixabay)

Maharashtra Weather Update: काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. हलक्या सरीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑगस्टच्या सरतीला पावसाचे पुनरागमन झाले आहे. आज महाराष्ट्रातील विदर्भ भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ पावसाची शक्यता दर्शवण्यात आली आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही भागात ४८ तासांसाठी यलो अर्यट जारी केला आहे. रिमझिम पावसाचा जोर आणखी वाढू शकतो. अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत आज हलक्या पावसाच्या सरी पडतील. मुंबई अंतर्गत भागात आणि पश्चिम उपनगरात पुढील ४८ तासात आणखी पावसाची शक्यता असणार आहे. विकेंडला पावसाची शक्यता असणास  आहे. महाराष्ट्र, विदर्भ आणि गोव्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान शास्त्रज्ञांनी मुंबईसह कोकण आणि घाटात हलक्या ते मध्यम स्वरूपचा पाऊस असणार आहे. राज्यातील काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मुंबई आणि कोकण भागात  पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून गोव्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली आहे.