Malad Wall Collapse Incident: मुंबईतील मुसळधार पावसामुळे मालाड येथे पिंपरीपाडा (Pimpripada) परिसरात भिंत कोसळली आहे. प्राप्त माहितीनुसार, आता मालाड दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा आता वाढून 18 वर तर जखमींची संख्या 50 च्या वर आहे. या दुर्घटनेतील जखमींवर शताब्दी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख़्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे. मुसळधार पावसामुळे पुणे, कल्याण, मालाड परिसरात भिंत कोसळली, दुर्घटनेत 22 जण ठार
ANI Tweet
#UPDATE Mumbai: 18 dead after a wall collapsed on hutments in Pimpripada area of Malad East due to heavy rainfall today. https://t.co/0rm63e57VL
— ANI (@ANI) July 2, 2019
रात्री 2 वाजण्याच्या सुमारास मालाड येथे भिंत कोसळली आहे. अद्यापही एनडीआरएफचे पथक मातीच्या ढिगार्याखाली दबलेल्यांसाठी बचावकार्य करत आहे. जखमींवर शताब्दी रुग्णालय आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असून चोघांची स्थिती चिंताजनक आहे. मालाड येथील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना सरकारने 5 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट येथे पहा
मुख़्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली
Mumbai: CM Devendra Fadnavis visits Shatabdi Hospital to meet the people injured in #Malad wall collapse incident today, Minister Yogesh Sagar also present. 18 people died and at least 13 were injured in the incident. #Maharashtra pic.twitter.com/IF13wzibdB
— ANI (@ANI) July 2, 2019
महाराष्ट्राला झोडपून काढलेल्या पावसाने मालाडप्रमाणेच कल्याण आणि पुण्यातही भिंत कोसळून दुर्घटना झाल्या आहे. 2जुलैला मुंबईत अतिवृष्टीचा धोका असल्याने गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन मुंबईकरांना, पुणेकरांना करण्यात आलं आहे.