Close
Advertisement
 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
14 minutes ago

Maharashtra Monsoon 2019 Live Updates: मुंबईची लाईफ लाईन हळूहळू पूर्वपदावर; धिम्या गतीने हार्बर आणि मध्य रेल्वे सुरू

महाराष्ट्र टीम लेटेस्टली | Jul 02, 2019 09:12 PM IST
A+
A-
02 Jul, 21:12 (IST)

मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या कमी ठेवण्याचा निर्णय मुंबई रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला. त्यामुळे उद्या (3 जुलै) या रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या तुलनेत कमी असतील.

02 Jul, 19:53 (IST)

मुंबई शहरात पावसाची संततधार दुपारनंतर कुठे कमी झाली आहे. नागरिकांना थोडा दिलासा मिळत आहे. तोपर्यंतच मुबई आणि पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

02 Jul, 18:03 (IST)

पिंपळपाडा येथे भिंत कोसळून घडलेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. हा आकडा आता 21  वर पोहोचला आहे. ताज्या आकडेवारीनुसार या घटनेतील जखमींची संख्या 78  इतकी झाली आहे.

02 Jul, 17:31 (IST)

मुसळधार पावसामुळे ठप्प झालेली मध्य रेल्वेची सेवा अखेर सुरु झाली आहे. दादर फास्ट लोकल सीएसएमटीहून रवाना. सीएसएमटी ठाणे रेल्वे सेवाही सुरु. मात्र, विस्कळितपणा कायम

02 Jul, 16:33 (IST)

मागील 14 तासांपासून अधिक काळ ठप्प झालेली हार्बर आणि मध्य रेल्वे आता हळूहळू सुरू करण्यात आली आहे. सीएसएमटी ते कसारा, कर्जत या मध्य रेल्वे मार्गावरील,  हार्बरच्या सीएसएमटी ते वाशी लोकल सुरू झाल्या आहेत. हार्बर मार्गावर 20 मिनिटं उशिराने ट्रेन धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या लोकल डहाणू पर्यंत 15-20 मिनिटं उशिराने धावत आहेत.

02 Jul, 16:11 (IST)

मुंबईकरांसाठी पश्चिम रेल्वे कडून 'हेल्पलाईन नंबर्स' जारी; मह्त्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर मिळवा लोकल ट्रेनचे अपडेट्स

02 Jul, 15:35 (IST)

सहा पम्पिंग स्टेशन मधून 14000 मिलियन लीटर पाणी समुद्रामध्ये फेकले; BMC ने ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. बाहेर फेकलेल्या पाण्याचं प्रमाण हे मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तुळशी आणि विहार तलावांपेक्षाही अधिक असल्याचा दावा बीएमसीने केला आहे.

02 Jul, 14:21 (IST)

मध्य रेल्वे काही प्रमाणात 'ट्रॅकवर' आणण्यास सुरूवात; CSMT कडून  कर्जत, टिटवाळा, बदलापूर, कल्याण साठी विशेष ट्रेन तर ठाणे - दादर विशेष ट्रेन चालवण्याचे प्रयत्न मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहेत. 

02 Jul, 14:01 (IST)

मुंबईसह मराठवाडा, विदर्भ भागात पुढील 48 तासात अति मुसळधार पावसाची शक्यता: भारतीय हवामान खात्याचा अंदाज .  प्रामुख्याने पर्यटकांनी डोंगरमाथ्यावर फिरायला जाणं टाळा. असं आवाहन करण्यात आलं आहे.

02 Jul, 13:39 (IST)

 मराठवाडा मध्ये पुढील दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा, कोकणात अतिवृष्टी, अनेक नद्यांनी पार केली धोक्याची पातळी. सतर्क राहण्याचे आवाहन. 

Load More

Mumbai Rains and Traffic Update: मागील दोन दिवसांपासून मुंबईमध्ये कोसळणारा पाऊस आजही कायम आहे. रात्रभर मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागात जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. परिणामी मुंबई सह उपनगरात रेल्वे आणि रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. मुंबईमध्ये पुढील काही तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने सरकारकडून गरज असल्यास बाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईत शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसोबतच शासकीय, निम शासकीय ऑफिस कर्मचार्‍यांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडावे.

दरम्यान मुंबईसह पुणे, कोकण परिसरातही पावसाचा जोर अधिक असल्याने तेथील नागरिकांनाही सुरक्षित राहण्याचं आणि गरज असल्यास बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई, पुण्यात संरक्षक भिंत कोसळून दुर्घटना झाल्याच वृत्त आहे.


Show Full Article Share Now