Maharashtra Monsoon Update: मुसळधार पावसामुळे पुणे, कल्याण, मालाड परिसरात भिंत कोसळली, दुर्घटनेत 22 जण ठार 
Pune Wall Collapse (Photo Credits: ANI)

रविवारी सुरु असलेल्या पावसाने सोमवारी रात्री काही वेळ विश्रांती घेतली असली तरीही सततच्या पावसाने पुणे, कल्याण आणि मालाड परिसरात भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या तीनही घटनांमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील पुण्यातील आंबेगावात सिंहगड कॉलेज कॅम्पस मध्ये 5 घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची मााहिती अग्निशमन दलाने दिली आहे. या दुर्घटनेत 6 ठार आणि 3 जण गंभीररित्या जखमी झाली आहे. तर मालाडमधील दुर्घटनेत 12 ठार आणि 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर कल्याणमधील नॅशनल उर्दू स्कूल कोसळल्याच्या दुर्घटनेत 3 जण मृत्यूमुखी पडले असून 1 जण जखमी झाला आहे.

मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 12 जण ठार झाले असून 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.  या दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

तर दुस-या घटनेत कल्याणमधील नॅशनल उर्दू शाळेची भिंत कोसळून त्यात तिघांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. पहाट 12:30 च्या सुमारास ही घटना घडली. तर पुण्यातील आंबेगावात सिंहगड कॉलेज कॅम्पस येथे पाच घरांवर सीमाभिंत कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. या अपघातात सहा जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. तर, तीन जण जखमी झाले आहेत. मृत नागरिक हे छत्तीसगडमधील रहिवासी असल्याचे समजते.

हेही वाचा- Maharashtra Monsoon 2019 Live Updates: पुणे शहरात अतिवृष्टीचा इशारा; गरज असेल तरच बाहेर पडण्याच पालिकेकडून पुणेकरांना आवाहन

जखमींना जवळील रुग्णालयात हलविण्यात आले असून घटनास्थळी एनडीआरएफचे पथकही दाखल झाले आहे.