Mumbai- Pune Expressway (Photo Credits: Twitter)

उद्या नाताळच्या (Christmas 2019) निमित्ताने तुमच्यापैकी अनेकांनी फिरायला जाण्याचे प्लॅन्स बनवले असतील, याचसाठी जर का तुम्ही मुंबई- पुणे (Mumbai-Pune) मार्गावरून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी ही माहिती असणे आवश्यक आहे. उद्या ऐतिहासिक धम्मभूमी वर्धापन दिनाच्या (Dhammabhumi Vardhapan Din) सोहळ्यानिमित्त मुंबई- पुणे मार्गावर देहू रोड (Dehu Road)  येथे वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल बुधवारी, 25 डिसेंबर रोजी सकाळी 7  ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे. मद्यपींसाठी खुशखबर! Christmas आणि New Year निमित्ताने सकाळी पाच वाजेपर्यंत दारू विक्रीला परवानगी

काय असणार आहे पर्यायी मार्ग

- जुन्या मुंबई- पुणे मार्गाने सोमाटणे फाट्याकडून निगडीकडे येणाऱ्या वाहनांना सेंट्रल चौकातून असणाऱ्या प्रवेशाऐवजी उजवीकडील मुंबई- बंगळुरू महामार्गावरून आपल्या गंतव्य स्थळी जाता येणार आहे.

-पिंपरी येथून देहू रोड मार्गे मुंबई कडे जाणारी वाहतूक निगडी चौकातील भक्ती- शक्ती चौकात बंद असेल तर याऐवजी बंद करून यायवजी रावेत मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे.

दरम्यान, उद्या मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर सुद्धा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे यामुळे नियमित लोकल सोबत पुणे व कोकणात जाणाऱ्या काही गाड्या रद्द असतील यामध्ये सीएसएमटी-पुणे सिंहगड, सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन, सीएसएमटी-मनमाड पंचवटी, सीएसएमटी-मनमाड राज्यराणी, दादर-जालना जनशताब्दी, सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी, सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर या गाड्यांचा समावेश आहे.