Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai- Pune Express Way) वर ओझर्डे (Ojharde) गावाजवळ आज, 6 मार्च रोजी सकाळी 6 च्या सुमारास दुधाचा पीकअप टेम्पो आणि एका कंटेनर मध्ये धडक होऊन भीषण अपघात (Road Accident)  झाल्याचे समजत आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या जखमींपैकी एकाची स्थिती अधिक गंभीर आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी त्वरित धाव घेऊन अपघातग्रस्त वाहनाला हटवण्याची सोय केली परिणामी तूर्तास वाहतुकीची कोंडी झालेली नाही.  मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील भीषण अपघातात कोल्हापूर मधील जिल्हा बँकेच्या अधिका-यांचा मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ओझर्डे गावाजवळ आज सकाळी सहा वाजता हा अपघात झाला. दूध वाहतूक करणाऱ्या पीक अप टेम्पोने भरधाव कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. यात टेम्पोचा चालक आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक जण जखमी झाला.यापैकी टँपो चालकाची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे समजत आहे. मुंबई: सायन उड्डाणपूल 6-9 मार्च दरम्यान वाहतुकीसाठी बंद

दरम्यान, मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा मागील वर्षभरात अपघातांचा अड्डाच झाला आहे. याआधी 1  मार्च रोजी रात्री भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. 3 दुचाकीस्वार लघुशंकेसाठी थांबले असताना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने त्यांना उडवले. तर त्यापाठोपाठ लगेचच 3 मार्च रोजी कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेतील साखर कारखाना कर्जपुरवठा विभागाचे व्यवस्थापक रणवीर चव्हाण यांचा अपघातात मृत्यू झाला होता.