मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune Express Way) एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा सहकारी बँकेतील साखर कारखाना कर्जपुरवठा विभागाचे व्यवस्थापक रणवीर चव्हाण (Ranveer Chavan) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ते 51 वर्षांचे होते. हा अपघात आज पहाटे झाला. रणवीर चव्हाण यांच्या यांच्या गाडीला अपघात झाला त्यातील अन्य 2 जण गंभीर जखमी आहेत. या दोघांना उपचारासाठी जवळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर चव्हाण आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे 2 अधिकारी सोमवारी रात्री खासगी गाडीने मुंबईला निघाले होते. त्यांची आज साखर कारखान्याच्या कर्जाबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी मंत्रालयात बैठक होती.
या बैठकीकरता हे दोघे कोल्हापूरहून निघाले होते. त्यासाठी प्रस्ताव घेऊन निघाले असता मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर त्यांच्या कारने पुढील ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत हा भीषण अपघात घडला असे सांगण्यात येत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू
या अपघातात रणवीर चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच रणवीर यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रणवीर चव्हाण हे अतिशय चांगले अधिकारी होते असे त्यांच्या कर्मचा-यांकडून तसेच जवळील मित्रपरिवाराकडून सांगण्यात येत आहे.
संताजी घोरपडे आणि अन्य एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात नेमका कुणाच्या चुकीमुळे घडला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Express Way) वर 1 मार्चच्या रात्री 11च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. 3 दुचाकीस्वार लघुशंकेसाठी थांबले असताना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने त्यांना उडवले. दरम्यान या अपघातामध्ये चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून एकाचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात अंडा पॉंईट येथील धोकादायक वळणावर असलेल्या दस्तुरी येथे झाला आहे.