मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Express Way) वर 1 मार्चच्या रात्री 11च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 3 दुचाकीस्वार लघुशंकेसाठी थांबले असताना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने त्यांना उडवले. दरम्यान या अपघातामध्ये चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून एकाचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात अंडा पॉंईट येथील धोकादायक वळणावर असलेल्या दस्तुरी येथे झाला आहे. सध्या पोलिस टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत. मुंबई-पुणे महामार्गावर टोलच्या दरात येत्या 1 एप्रिलपासून वाढ, वाहनचालकांना बसणार फटका.
दरम्यान प्राप्त माहितीनुसार मयत दुचाकीस्वार हे तळेगाव दाभाडे येथील कामगार असून ते सुट्टी असल्याने अलिबागला फिरायले गेले होते. दरम्यान परतताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या तरूणांवर अचानक आलेल्या टेम्पोने धडक दिली. अपघातानंतर टेम्पोचा ड्रायव्हर फरार असून खंडाळा महामार्ग पोलिसांकडून त्याचा शोध घेत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर आता 120 KMPH वर चालवा गाडी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ठरावाला मंजुरी.
ANI Tweet
Maharashtra: Five people dead and one injured after a collision between three motorcycles and a truck in Raigad district on Pune-Mumbai Highway last night. pic.twitter.com/axdimicGSP
— ANI (@ANI) March 2, 2020
वाहतुकीच्या नव्या नियमांनुसार खाजगी वाहन चालकांना ताशी 120 किमी पर्यंत वेग वाढवण्याची मुभा आहे. तर राज्य सरकारच्या व खाजगी बसलादेखील ताशी 100 किमी इतक्या वेगात मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहन चालवण्याची अनुमती देण्यात आली आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी व्होल्वो बसच्या भीषण अपघातात संचेती हॉस्पिटलचे डॉ. केतन खुर्जेकर यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला होता. गाडीचा टायर पंक्चर झाल्याने तळेगाव जवळ गाडी थांबली होती, व कार चालक ज्ञानेश्वर बोडस पंक्चर काढत होते इतक्यात पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव लक्झरी बसने कार ला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला होता.