पोलीस कॉन्स्टेबल तेजेश सोनवणे (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस अहोरात्र मेहनत घेत आहेत. लॉकडाऊन काळात तर त्यांच्यावरील जबाबदारी अधिक वाढली होती. अशावेळी जीवाची पर्वा न करत पोलिस दल कार्यरत होते. कर्तव्यदक्ष मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आपल्या ड्युटीपलिकडे जात कोविड-19 च्या कठीण काळात कार्य केले आहे. असेच एक पोलीस कॉन्स्टेबल तेजेश सोनवणे. आपल्या सहकारी कोव्हिड योद्धांना मदत करण्यासाठी कोरोना बाधित रुग्णांना स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पोहचवण्याचे कार्य ते करत आहेत. तेजेस सोनावणे यांच्या या कार्याला मुंबई पोलिसांना सलाम केला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल तेजेश सोनवणे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा एक व्हिडिओ मुंबई पोलिसांनी ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये मुंबई पोलिसांनी लिहिले, "मदतीसाठी धावणारी चार चाकं! पोलीस कॉन्स्टेबल तेजेश सोनवणे आपल्या सहकारी कोव्हिड योद्धांना मदतीचा हात देण्यासाठी कर्तव्यापलीकडे जाऊन रुग्णांना स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पोहचवण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या या सेवाभावाचा आम्हाला अभिमान आहे." (पोलिस नाईक संध्या शीलवंत यांनी 4 बेवारस मृतदेहांवर केले अत्यंसंस्कार; या धाडसी कार्याबद्दल मुंबई पोलिसांनी ट्विटद्वारे केले कौतुक)

Mumbai Police Tweet:

पोलीस कॉन्स्टेबल तेजेश सोनवणे हे पोलिसांची ड्युटी केल्यानंतर कोरोनाग्रस्त रुग्णांना रुग्णालयात पोहचवण्यासाठी वाहन चालकाची ड्युटी करतात. त्यासाठी त्यांनी आपल्या मित्राच्या गाडीत थोडेफार बदल केले आणि रुग्णांच्या सेवेसाठी हजर झाले. आतापर्यंत त्यांनी 9 रुग्णांना मदत केली आहे.