महाराष्ट्र पोलिस अधिकारी सचिन वाझे (API Sachin Waze) यांना काल (13 मार्च) रात्री उशिरा अटक करण्यात आली. NIA ही कारवाई केल्यानंतर आज त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यात कोर्टाने त्यांना 25 मार्चपर्यंत NIA कोठडी (NIA Custody) सुनावली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईस्थित घराबाहेर 25 फेब्रुवारी रोजी स्फोटाने भरलेली एक गाडी सापडली होती. काही दिवसानंतर 5 मार्चला या गाडीचा बेपत्ता झालेला मालक मनसुख हिरेन यांचे मुंब्रा खाडीत मृतदेह सापडला होता. या सर्व प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव समोर आले होते.
त्यानंतर काल सलग 13 तास सचिन वाझे यांची चौकशी केल्यानंतर आज त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्यांना 25 मार्चपर्यंत NIA कोठडी सुनावण्यात आली आहे.हेदेखील वाचा- Ambani House Bomb Scare: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ पार्क करून इनोव्हाने पळ काढणाऱ्या संशयित आरोपीने वापरलेली कार मुंबई पोलिसांची, तपासात धक्कादायक खुलासा
Mumbai police officer Sachin Waze has been sent in NIA custody till March 25, in connection with his role & involvement in placing explosives-laden vehicle near Mukesh Ambani's house in Mumbai on February 25
— ANI (@ANI) March 14, 2021
25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर एक स्कॉर्पिओ कार सापडली होती. या कारमध्ये जिलेटिनच्या काठ्या ठेवल्या गेल्या होत्या. या प्रकरणी सचिन वाझे हे सुरुवातीला तपास करत होते. नंतर, त्यांना या प्रकरणाच्या चौकशीतून काढून टाकण्यात आले आणि या प्रकरणाची चौकशी एनआयएने त्यांच्या हातात घेतली.
दरम्यान मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया (Antilia) निवास्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ पार्क करून ज्या इनोव्हाने संशयित आरोपीने पळ काढला होता, ती कार मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांची (Mumbai Crime Branch Police) होती, अशी धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे.