Ambani House Bomb Scare: मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया (Antilia) निवास्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ पार्क करून ज्या इनोव्हाने संशयित आरोपीने पळ काढला होता, ती कार मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांची (Mumbai Crime Branch Police) होती, अशी धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार 25 फेब्रुवारीला अँटिलिया बाहेर एक स्कॉर्पिओ आणि दुसरी इनोव्हा कार आढळून आली होती. चालक स्कॉर्पिओ सोडून इनोव्हा कारमध्ये बसून घटनास्थळावरू पळून गेला होता. या इनोव्हा कारला सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कार्यालयात आणले गेले. ही इनोव्हा कार मुंबई क्राइम ब्राँचची असल्याचे सांगण्यात येत आहे. (वाचा - Sanjay Raut यांचा केंद्रावर पुन्हा हल्लाबोल; महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणा पाठवून महाविकास आघाडी सरकार आणि Mumbai Police यांच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न)
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयास्पद कार जप्त झाल्यानंतर सचिन वाझे यांच्या टीममधील अनेक अधिकाऱ्यांना चौकशीला सामोर जाव लागू शकतं. वाझे यांच्या टीमचे सदस्य असलेले मुंबई पोलिसांच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटचे चार सदस्य चौकशीसाठी आज एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, एनआयए सध्या मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी रियाज काझी यांची चौकशी करत आहेत.
एनआयएच्या कारवाईवर संजय राऊत यांचा हल्लाबोल -
एनआयएने गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात केलेल्या कारवाईनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी सचिन वाझे यांचे प्रामाणिक व सक्षम अधिकारी म्हणून वर्णन केले आहे. राऊत यांनी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला प्रश्न करत विचारलं आहे की, अँटिलिया बाहेर स्कोर्पिओमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या काड्यांची तपासणी ही मुंबई पोलिसांचीचं जबाबदारी होती. यासाठी कोणत्याही राष्ट्रीय एजन्सीची गरज नव्हती.