Mumbai Police | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Mumbai contract police Bharti News: मनुष्यबळाची टंचाई दूर करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने (Maharashtra State Home Department) चक्क कंत्राटी पोलीस भरती (Mumbai Police Force Contract Recruitment 2023) करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलासाठी राज्य सुरक्षा महामंडळामार्फत ही भरती कंत्राटी स्वरुपात (Contract Method) असेल. तसेच, 11 महिने इतक्या कमाल कालावधीसाठी ही भरती करण्यात येणार आहे. लवकरच कायम तत्वावरील पोलिसांची भरती केली जाईल. त्यासाठी पगाराची रक्कम म्हणून 30 रुपयांच्या खर्चासही राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. तोपर्यंत आवश्यक असलेली मनुष्यबळाची चणचण कमी करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

केवळ 11 महिन्यांसाठी कंत्राटी पोलीस

प्राप्त माहितीनुसार, पोलीस आयुक्तांनी केलेल्या विनंतीनुसार राज्याच्या गृह विभागाने कंत्राटी भरती संदर्भात निर्णय घेतला. मुंबई पोलीस दलात असलेली मनुष्यबळाची टंचाई भरुन काढण्यासाठी कंत्राटी भरती करण्यात यावी, अशी मागणी विनंतीद्वारे करण्यात आली होती. गृह विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार ही भरती किमान 11 महिन्यांसाठी असेल. कंत्राटी भरतीद्वारे सेवेत दाखल झालेल्या पोलिसांच्या पगारासाठी सरकारने 30 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

कंत्राटी भरतीचे कारण

मुंबई हे राज्याच्या राजधानीचे शहर आहे. तसेच ते आंतरराष्ट्रीय शहरही आहे. त्यामुळे या शहरात नानाविध सण, उत्सव, कार्यक्रम, मोर्चे आणि इतर अनेक गोष्टी घडत असतात. खास करुन गणपती उत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, ईद यांसारके धार्मिक कार्यक्रम. या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी पोलीस दलास मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यामुळे सण उत्सव काळात आवश्यक प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी कमीत कमी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस दलातील कंत्राट समाप्त झाले की, सुरक्षा महामंडळाचे जवान पुन्हा आपल्या पूर्वीच्या सेवेत रूजू होतील.

दरम्यान, कंत्राटी स्वरुपात पोलीस भरती करण्याच्या निर्णायावर समाजातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस हा समाजातील कायदा व्यवस्था कायम राहावी यासाठी प्राधान्यान्याने प्रयत्न करणारा महत्त्वाचा घटक असतो. अशा वेळी तो जर कायम तत्वावरील सेवेत असेल तर त्याच्यावरील जाबाबदाऱ्या अधिक वाढतात. मात्र, तो व्यक्ती जर कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आला असेल तर तो जबाबदारीने वागेलच याची काय खात्री? शिवाय त्यांना प्रशिक्षण कोण आणि कसे देणार. त्या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन नोकरी कालावधी संपल्यानंतर तो काही चुकीचे पाऊल टाकणार नाही कशावरुन? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.