TV TRP | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मुंबई पोलिसांच्या ( Mumbai Police) गुन्हे अन्वेशन विभागाने सोमवारी कथीत टीआरपी घोटाळा प्रकरणात तब्बल 1400 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोप पत्रात रिपब्लिक मीडिया नेटवर्क((Republic Media Network) आणि न्यूज नेशन (News Nation), फक्त मराठी (Fakt Marathi), बॉक्स सिनेमा ( Box Cinema) यांच्यासह 6 वाहिन्यांचा समावेश आहे. आरोपत्रतात उल्लेख असलेल्या सर्व चॅनल्सवक (वाहिन्या) पेसै देऊन टीआरपीचे आकडे फूगवल्याचा आरोप आहे. या वाहिन्या पाठीमागील दोन वर्षांपासून अशा गोष्टी करत असल्याचेही म्हटले आहे. आरोपपत्रात रिपब्लिक मीडिया आणि न्यूज नेशनच्या ालकांना पोलिसांनी वॉन्टेड म्हटले आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, त्यांना सप्लीमेंट्री चार्जशीट आरोपी बनवले जाऊ शकते.

मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली एक सीलबंद पाकीटात आपला चौकशी अहवाल सादर करण्याच्या एक दिवस आगोदर हे आरोपपत्र दाखल केले आहे. उच्च न्यायालय रिपब्लिक मीडिया द्वारा दाखल एका याचिकेवर सुनावई करत आहेत. या याचिकेत चॅनल (विहिनी) विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करत असलेले क्राइम इंटेलिजेंस यूनिट (CIU) चे असिस्टंट इन्स्पेक्टर सचिन वझे यांनी म्हटले आहे की, टीआरपी वाढविण्यासाठी पैसैे देण्यासोबत आम्हाला असेही आढळून आले आहे की रिपब्लिक नेटवर्कने ड्यूल लॉजिकल चॅनल नंबर (LCN) ची मदत घेतली होती. एलसीएनचा उपयोग करुन एक विशेष चॅनल केवळ लोकांकडून वार्तांकन करताना पाहिले जात होते. तर तेच चॅनल लहान मुलांकडूनही पाहिले जात होते. या चॅनलची टीआरपी दोन फ्रिक्वेन्सीमध्ये दिसत होती. ज्यामुळे टीआरपी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे पाहायला मिळत होते. (हेही वाचा, TRP Rigging Scam: टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल)

मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा गेल्या महिन्यात पुढे आणला होता. या प्रकरणा रेटिंग एजन्सी ‘ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल' (बार्क) ने ‘हंसा रिसर्च ग्रुप' च्या माध्यमातून एक तक्रार दाखल केली होती. यात काही टीव्ही चॅनल्स (वहिन्या) टीआरपीच्या आकड्यांमध्ये फेरफार करत आहेत. 'व्ह्यूअरशिप डेटा' (कोणते प्रेक्षक किती काळ कोणता चॅनल पाहात आहेत) जमा करण्याचे काम 'हंसा' कंपनीला देण्यात आले होते.

दरम्यान, मुंबई पोलीस कमिशनर परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी गेल्या महिन्यात दावा केला होता की, रिपब्लिक टीव्ही आणि बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी हे दोन चॅनल टीआरपी आकडेवारी फेरफार करण्यात आघाडीवर होते. दरम्यान, रिपब्लिक टीव्ही आणि इतर अन्य आरोपींनी अशा प्रकारच्या कोणत्याही फेरफार केल्याच्या आरोपाचे खंडण केले आहे.