मुंबईतील (Mumbai) लालबाग (Lalbaug) परिसरात सिलेंडरचा भीषण स्फोट (Gas Cylinder Explosion) झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत 20 जण होरपळून जखमी झाले असून केईएम व ग्लोबल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, जखमींपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. स्फोट झालेल्या खोलीमध्ये मागील काही दिवसांपासून गॅस लीकेजचा वास येत होता. रविवारी सकाळी वास कुठून येतोय? हे पाहण्यासाठी स्थानिक नागरिक शोध घेत गेले असता अचानक स्फोट झाला, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, स्फोट कसा झाला? ती खोली कोणाची आहे? याविषयी अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही. या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसेच, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही घटनास्थळी धाव घेऊन जखमींची भेट घेतली होती. मात्र, काही तासांपूर्वी जखमींपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- Beed Couple Suicide: पत्नी प्यायली विष, त्यानंतर पतीनेही घेतला गळफास; बीड येथील धक्कादायक घटना
एएनआयचे ट्विट-
Mumbai: One person dead, five people remain critical who were injured in cylinder blast in Lalbaug area, earlier today. Total 20 people were injured in the incident. https://t.co/9FnneiOm3e
— ANI (@ANI) December 6, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, तिथे लग्नाची तयारी सुरु होती. घरात स्वयंपाक तयार करण्याचे काम सुरु असतानाच गॅस लीकेजचा वास येऊ लागला. त्यामुळे लोकांनी शोधाशोध सुरू केली होती. या स्फोटात नवरी मुलगी आणि तिचे वडीलही जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहेत.