प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credits: ANI)

पती-पत्नीने आमहत्या (Couple Suicide) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही बीडमधील (Beed) परळीच्या पांगरी कॅम्प येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून स्थानिक पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहे. दोघांमध्ये झालेल्या अंतर्गत वादातून हा प्रकार घडला आहे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

प्रियंका पंडित आणि सायस पंडित अशी आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्यांची नावे आहेत. या दोघांनीही आत्महत्या केल्याची माहिती होताच, स्थानिकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. या दोघांनीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप समोर आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे, अशी माहिती टीव्ही9ने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा-  Mumbai: खेळताना चुकून फुगा गिळल्याने 4 वर्षीय मुलाचा मृत्यू; अंधेरी येथील घटना

दरम्यान, या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी परळी पोलीस स्थानिकांची आणि मृतांच्या नातेवाईकांचीही चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच या दोघांमध्ये काही वाद झाला का? कशामुळे या दोघांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले? याची कसून चौकशी केली जात आहे. तर, जोडप्याच्या अशा अकाली जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.