राष्ट्रवादी काँग्रेस (NCP ) पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी आज (25 जुलै 2019) शिवसेना (Shiv Sena ) पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान 'मातोश्री' (Matoshree) येथे हा पक्ष प्रवेश झाला. सचिन अहिर यांच्या शिवसेना शिवसेना प्रवेशाबाबत गेले काही काळ राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ सोडत शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, यांच्यासह अनेक शिवसेना नेते आणि शिवसैनिक तसेच, अहिर यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या वेळी मातोश्रीवर जमले होते.
सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र, या प्रवेशाबात बोलताना अहिर म्हणाले की, गेली अनेक वर्षे मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत काम केले. आजही माझ्या हृदयात शरद पवार यांचे स्थान कायम आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. राजकारणात निर्णय घेतले जातात. आपण विकासाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, असे अहिर यांनी म्हटले.(हेही वाचा, मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष सचिन अहिर शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची शक्यता; WhatsApp वरील व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण)
एएनआय ट्विट
Maharashtra: Mumbai NCP president Sachin Ahir, joins Shiv Sena in the presence of party chief Uddhav Thackeray. pic.twitter.com/LWcP5SgUL5
— ANI (@ANI) July 25, 2019
दरम्यान, शिवसेना पक्षात प्रवेश करताना मला कोणाचा पक्ष फोडायचा नाही. जर कोणी स्वखूशीने येत असेल तरच त्यांना प्रवेश दिला जाईल असे उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोड्यापूर्वी मी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेटलो होतो. अर्थात, त्यांना मी माझ्या पक्षांतराच्या निर्णयाबाबत सांगितले नाही. पण, माझ्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा मी त्यांना सांगितला. पक्षातील काही प्रमुख नेत्यांनाही मी पक्षांतराच्या निर्णयाचे सुतोवाच केले होते. त्यातील काहींनी मला विरोध दर्शवला. पण, काहींनी मोकळ्या मनाने पाठिंबाही दिला, असेही सचिन अहिर यांनी या वेळी सांगितले.