BMC (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत (Mumbai) आढळून आले आहेत. मुंबईत दिवसेगणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 24 जून पर्यंत मुंबई महानगरपालिकेने एकूण 6 हजारांहून अधिक सील केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने कंटेन्मेंट झोनची नवी यादी जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने मिशन बिगिन अगेन या अंतर्गत या लॉकडाऊनमध्ये काही भागात सूट दिली आहे. तर, काही भागात अद्यापही कडक संचारबदी आहे. दरम्यान, तुमच्या एरियातील कोरोनाची सध्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईतील धारावी झोपडपट्टी, वरळी कोळीवाडा या भागात सुरुवातील मोठ्या संख्येत रुग्ण आढळून आले होते. मात्र, ता या भागातील रुग्णसंख्या बऱ्या प्रमाणात नियंत्रणात आली आहे. तर, कांदिवली, बोरीवली, मलाड, वांद्रे, मुलुंडं, भांडूप यांसारख्या उपनगरात कोरोनाचे जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. ज्यामुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणादले आहेत. तसेच या भागातील संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. हे देखील वाचा- मुंबई पोलिसांकडून 'Free Covid Testing' इमेल्स बाबत स्पॅम अलर्ट; लिंक ओपन न करण्याचं आवाहन

कोरोनावर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग उप्रकम हाती घेतले आहे. या उपक्रम अंतर्गत अवघ्या अर्ध्या तासात कोरोनाची चाचणीचा अहवाल मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकेने ऍन्टीजेन टेस्टिंगच्या 1 लाख किट खेरदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्य शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार, रॅपिड टेस्टिंग कीट खरेदी करून आपल्या कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यास कॉर्पोरेट हाऊस, खाजगी कंपन्यांनाही सुचव.ण्यात आले आहे