चीन कडून फिशिंग तंत्र वापरून भारतामध्ये सायाबर हल्ला होऊ शकतो या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सायबर सेलकडून अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता आज (25 जून) मुंबई सी पी यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मुंबईकरांसाठी स्पॅम अलर्ट जारी करण्यात आला आहे. ” कोवीड-१९ ची मोफत चाचणी करुन देण्याबाबत प्रसारीत होत असलेले ई-मेल खूप वाढत आहेत. त्यामध्ये दिलेली लिंक उघडू नका. आपल्याला फसवण्याचा हा एक मार्ग आहे. समजदार बना… सुरक्षित रहा,” असं आवाहन मुंबईचे पोलिस कमिशनर परम बीर सिंह(Param Bir Singh) यांनी केले आहे. Maharashtra Cyber Department Advisory: व्हायरल होत असलेला 'मोफत कोरोना चाचणी'चा मेसेज खोटा; सायबर हल्ल्यासाठी चीनने विणले जाळे; महाराष्ट्र सायबर विभागाने जारी केले मार्गदर्शक तत्वे.
कोरोना संकट काळामध्येच भारत-चीन मध्ये ताणलेले संबंध याच्या पार्श्वभूमीवर आता चीनी हॅकर्सकडून सायबर हल्ला होऊ शकतो अशी भीती वर्तवण्यात आली आहे. सद्या जनसामान्यांच्या मनात असलेल्या कोरोना व्हायरसच्या भीतीचं भांडवल करत मोफत कोविड चाचणी याचं आमिष दाखवून काही लिंक्स बनवल्या जाऊ शकतात. अशाप्रकारचे इमेल आले तरीही त्यावर क्लिक करू नका असं आवाहन आता करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी ट्वीट मध्ये अशा इमेल्सचा एक स्क्रिन शॉर्ट देखील शेअर केला आहे. हे इमेल्स स्पॅम असल्याचं सांगण्यात आलं आहे.
CP Mumbai Police ट्वीट
Don't 'click' on the 'bait'!
Phishing emails claiming to provide 'Free Covid-19 Testing' are on the rise.
Do not open any attachments or links on such emails. #ScamAlert pic.twitter.com/1nCjHU6JIa
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) June 25, 2020
महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये काल राज्यात 24 तासामध्ये 3,890 कोरोनाग्रस्त रुग्ण समोर आले आहेत. तर 208 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता 1,42,900 पर्यंत पोहचली आहे. तर 6739 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.