मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांची 'द ललित' ला भेट, मोठ्या हॉटेल्सच्या लसीकरण पॅकेजचा केला खुलासा
किशोरी पेडणेकर (Photo Credits-Twitter)

देशभरासह राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना सातत्याने नियमांचे पालन करावे असे सांगितले जात आहे. तसेच कोरोनाच्या परिस्थितीच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेतच. पण लसीकरणाचा वेग सुद्धा वाढवला आहे. अशातच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल 'द ललित' येथे भेट दिली. तर काही हॉटेल्सकडून विशेष पॅकेजमध्ये कोरोनाची लस दिली जात असल्यास कारवाई करण्याचे निर्देशन राज्यासह केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. अशातच आता पॅकेजमध्ये लसीकरणाची सुद्धा ऑफर देणे नियमांच्या विरोधात आहे. त्यामुळे ज्या कोणत्याही हॉटेल्समध्ये असा प्रकार घडत असेल त्यांनी ते तातडीने थांबवावे असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

किशोरी पेडणेकर यांना द ललित हॉटेलमध्ये 3500 रुपयांच्या पॅकेजमध्ये लस दिली जात असल्याचे कळले. तेव्हा त्यांनी थेट हॉटेल्समध्ये भेट दिली. तर प्रत्येक दिवसाला येथे 500 जणांना कोरोनावरील लस दिली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली. याबद्दल पेडणेकर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. ऐवढेच नव्हे तर फ्रिजमध्ये लसींचा साठा ठेवल्याचे समोर आले.(BMC पाठोपाठ आता परदेशात शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी Pune Municipal Corporation चं विशेष व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह; पहा कुठे, कधी, कशी मिळणार लस?)

Tweet:

दरम्यान,  मुंबई शहरात कोरोना विषाणूच्या 1048 रुग्णांची व 25 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या शहरात 27617 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच 1359 रुग्ण बरे झाले आहेत. तर राज्यात येत्या 15 जून पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. मात्र येत्या 1 जून रोजी नव्या गाइडलाइन्स जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.