Mumbai Local Megablock 15th March: हार्बर आणि पश्चिम रेल्वे वर उद्या मेगाब्लॉक; मध्ये रेल्वे प्रवाशांना दिलासा
Image For Representation (Photo Credits-Facebook)

मुंबई लोकलचा (Mumbai Local) रविवार म्हणजेच मेगाब्लॉकचा (Megablock) आणि लोकलच्या उशिराने धावणाऱ्या फेऱ्यांचा वार म्ह्णून ओळखला जातो. सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची तपासणी आणि दुरुस्ती अशी अनेक कामे या दिवशी पार पडतात. उद्या म्हणजेच 15 मार्च रोजी सुद्धा मुंबई लोकलच्या पश्चिम (Western Railway) आणि हार्बर मार्गावर (Harbour Railway) मेगाब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळेस मध्य रेल्वेच्या कल्याण आणि टिटवाळा या स्थानकाच्या दरम्यान शुक्रवार आणि शनिवार म्हणजेच 13 व 14 मार्च रोजी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आला होता  ज्यामुळे उद्या म्हणजेच रविवारी मध्य रेल्वे (Central Railway)  मार्गावर ब्लॉकला सुट्टी देण्यात आली आहे. उद्या, कुर्ला (Kurla)  ते वाशी (Vashi) आणि सांताक्रूझ (Santacruz) ते गोरेगाव (Goregaon) दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी काही लोकल फेऱ्या रद्द तर काही उशिराने धावणार आहेत.

जाणून घ्या 15 मार्च चे मेगाब्लॉक चे वेळापत्रक

पश्चिम रेल्वे

सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत अप आणि डाऊन धीमा मार्गावर ब्लॉक घेणार आहे. ब्लॉकवेळेत डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येतील. या लोकलला विलेपार्ले स्थानकात दोन वेळा थांबा देण्यात येईल. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून, काही विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे

कुर्ला ते वाशी या स्थानकांच्या दरम्यान सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 मध्ये अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी ते वाशी/नेरुळ/पनवेल मार्गावरील अप आणि डाऊन लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. यादरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

पहा ट्विट

दरम्यान, मेगाब्लॉक च्या निम्मिताने पार पडणारी कामे ही आठवड्याभरातील रेल्वेच्या सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाची असतात, त्यामुळे प्रवाशांना गैरसोय सहन करूनही सहाय्य करण्याचे आवाहन केले जाते. मात्र दुसरीकडे कधी ओव्हरहेड वायर तुटल्याने, कधी सिग्नल बिघडल्याने भर कामाच्या दिवसात ट्रेनचा खोळंबा झाल्याच्या घटनांमुळे अनेकदा प्रवासी संतप्त दिसून येतात.