मध्य रेल्वे वर आज (शुक्रवार, 13 मार्च) आणि उद्या (शनिवार 14 मार्च) रोजी कल्याण (Kalyan) आणि टिटवाळा (Titwala) स्थानकांच्या दरम्यान रात्रकालीन पॉवर ब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. परिणामी काही शुक्रवारी रात्री उशिरा आणि शनिवारी सकाळी लवकर सुटणाऱ्या काही नियमित लोकल तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द ठेवण्यात येणार आहेत. हा ब्लॉक अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर घेण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार, 13 मार्च शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजल्यापासून ते 14 मार्च पहाटे 6 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल.तर त्यांनंतर पुन्हा 14 मार्चच्या रात्री 11.50 ते पहाटे 3.50 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळेत टिटवाळा येथील पादचारी पुलाच्या गर्डरचे काम करण्यात येणार आहे. दरम्यान, या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी रद्द करण्यात आलेल्या गाड्यांचे वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करावे अशी सूचना मध्य रेल्वे ने ट्विटर च्या माध्यमातून दिली आहे.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नामांतर करण्यास ठाकरे सरकारची मंजुरी
कल्याण ते टिटवाळा दरम्यान रद्द असणाऱ्या लोकल (14 मार्च सकाळी)
कल्याण ते आसनगाव- प. 5.28वा.
सीएसएमटी ते कसारा- प. 4.15 वा.
विद्याविहार ते टिटवाळा- प. 4.51 वा.
विद्याविहार ते टिटवाळा- प. 5.12 वा.
टिटवाळा ते सीएसएमटी- प. 4.32 वा.
टिटवाळा ते सीएसएमटी- प. 5.35 वा.
कल्याण ते टिटवाळा दरम्यान बदललेल्या लोकलच्या वेळा
- कसारा ते सीएसएमटी पहाटे 3. 51 ची लोकल सकाळी 5. 03 ला कल्याण ते सीएसएमटी चालवली जाईल.
- टिटवाळा- सीएसएमटी पहाटे 4. 01 ची लोकल सकाळी 5. 14 ला कुर्ला ते सीएसएमटी चालवली जाईल.
-टिटवाळा- सीएसएमटी पहाटे 5.11 ची लोकल सकाळी 6. 26 ला कुर्ला ते सीएसएमटी चालवली जाईल.
14 मार्च च्या रात्री रद्द झालेल्या लोकल
टिटवाळा ते सीएसएमटी दरम्यान, रात्री 10, रात्री 10. 51 , रात्री 11. 44 वाजताच्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर, सीएसएमटी ते टिटवाळा दरम्यान, रात्री 8. 21 , रात्री 9 आणि रात्री 10. 06 ची लोकल रद्द राहणार आहे.
(अधिक माहितीसाठी) मध्य रेल्वे ट्विट
Special traffic and power block between Kalyan and Titwala. Train running pattern will be as under 👇 pic.twitter.com/3P1sEi1FXc
— Central Railway (@Central_Railway) March 13, 2020
दरम्यान, दर रविवारी मुंबई लोकलच्या तिन्ही मुख्य रेल्वे मार्गांवर ब्लॉक घेतला जातो. यादरम्यान रूळाचे, तांत्रिक बिघाड, सिग्नल यंत्रणा याच्यातील दुरूस्तीचे काम केले जाते. मात्र या आठवड्यात मध्य रेल्वे वर हा ब्लॉक आधी घेतला जात असल्याने शनिवारी कामावर जाणाऱ्या मंडळींना त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्या सुद्धा काही प्रमाणात रद्द झाल्याने वीकएंड ला बाहेर जाण्याचा प्लॅन असणाऱ्यांची सुद्धा पंचाईत होऊ शकते.