Mumbai Local: कोरोना व्हायरसच्या काळात लोकल पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन जसा हळूहळू उठवण्यात आला तसा आता सर्वसामान्यांना सुद्धा लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली गेली आहे. परंतु यासाठी सुद्धा काही नियम आणि अटी सुद्धा लागू करण्यात आल्या आहेत. अशातच आता विकेंड्स आणि सुट्टीच्या दिवशी सर्वसामान्यांसाठी संपूर्ण वेळ लोकल सुरु ठेवावी अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेकडून करण्यात आली आहे.(मध्य रेल्वेच्या EMU सेवेला पूर्ण झाली 96 वर्ष; जाणून घ्या VT-Kurla दरम्यान सुरू झालेल्या या सेवेबद्दल खास गोष्टी)
सध्या लोकलची सर्वसामान्यांसाठी ठरवण्यात आलेली वेळ ही सर्वांसाठीच सोईस्कर नाही आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सर्वसामान्यांना लोकल प्रवास पूर्ण वेळ सुरु ठेवावा असे ही प्रवासी संघटनेने म्हटले आहे. त्याचसोबत गेल्या 10 महिन्यानंतर आता कुठे लोकलने प्रवासाची मुभा दिली गेली आहे. पण ही ही सेवा पूर्णवेळ नसल्याने कर्जत, कसारा, विरार, पनवेल येथून येणाऱ्या नागरिकांना मुंबईत येता येत नाही आहे.(Mumbai Local for General Public: लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यानंतर पहिल्याचं दिवशी रेल्वेच्या तिजोरीत 2.09 कोटी रुपयांची भर; पहा पहिल्या दिवशी काय घडलं?)
दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांना सकाळी 7 वाजताची पहिली ट्रेन, त्यानंतर 12 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत आणि रात्री 9 ते शेवटच्या लोकलने प्रवास करता येणार आहे. परंतु लोकलच्या या वेळा चुकवल्यास तर प्रवाशाला 200 रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचसोबत सरकारी सुचनांचे पालन न केल्यास कलम 188 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. तसेच कोरोना व्हायरसच्या नियमांचे सुद्धा प्रवासादरम्यान पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.