95 Years OF EMU Service | Photo Credits: CR Twitter Handel

मध्य रेल्वेसाठी 3 फेब्रुवारी हा दिवस खास आहे. 96 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मध्य रेल्वेवर पहिली EMU सेवा सुरू करण्यात आली होती. आज त्याची 96 वी वर्षपूर्ती आहे. यानिमित्ताने मध्य रेल्वेनेही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याचे खास फोटो देखील शेअर केले आहे. दरम्यान तत्कालीम बॉम्बे वीटी चे गर्व्हनर Sir Leslie Wilson यांनी 3 फेब्रुवारी 1925 दिवशी पहिल्या ईएमयूला हिरवा झेंडा दाखवत 4 कोचच्या गाडीला सुरू केले होते. दरम्यान ही सेवा आताच्या हार्बर लाईन वर सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान धावली होती.

पहिल्या EMU service बद्दल खास गोष्टी

पहिली ई एमयू ही 50 miles/hour या कमाल वेगाने धावली होती. या साठी टाटा ग्रुप ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक कंपनीने वीज पुरवली होती. टाटा मेन मधून धारावी, कल्याण, ठाणे येथील सब स्टेशन मध्ये वीज दिली जात असे. तर रेल्वे सब स्टेशनमध्ये AC to DC हा बदल rotary converters कडून केला जात आहे. याची क्षमता 2500 KW ही 1500V DC व्हॉल्टेजसाठी होती. मुंबई: CSMT ते ठाणे सुरु झाली पहिली ट्रेन; जाणून घ्या इतिहास.

वाडीबंदर मध्ये उंचीवर असलेलं एक सेक्शन हा हार्बर लाईन वरील इंजिनियरिंग मार्व्हल आहे. 2788 टन स्टील वापरून हार्बर लाईन साकारण्यात आली होती. त्यासाठी 20 लाख खर्च आहे. तर हार्बर लाईन वर इलेक्ट्रिफिकेशन करण्यासाठी 8 कोटी खर्च करण्यात आला होता.