Mumbai: कल्याण मधील चस्का कॅफेआड सुरु असलेल्या हुक्का पार्लवर गुन्हे शाखेकडून छापेमारी, 80 हून अधिक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Mumbai:  कोरोना व्हायसरचे थैमान अद्याप कायम असल्याने नागरिकांनी नियमाचे पालन करावे अशा वारंवार सुचना दिल्या जात आहेत. तरीही नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने आता थेट कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर कल्याण मधील चस्का कॅफेआड हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार गुन्हे शाखेने या कॅफेवर छापेमारी करत जवळजवळ 80 हून अधिक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच कॅफेमध्ये 100 हून अधिक तरुण तरुणी हुक्का ओढत असल्याचे ही दिसून आले.(Night Curfew in Mumbai: मुंबई पोलीस राजी; नाईट कर्फ्यू काळात नागरिकांना दुचाकी, चारचाकीने प्रवास करण्यास सशर्थ परवानगी)

कल्याण पश्चिमेला असलेल्या चस्का कॅफेआड हुक्का पार्लस सुरु अशल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार त्यांनी कॅफेवर छापा टाकत तेथे कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला. त्यानुसार पोलिसांकडून कॅफेच्या मालकासह तेथील कर्मचाऱ्यांना नोटिस दिली आहे. गुन्हे शाखेने कारवाई करत कॅफेमधील हुक्क्यासह अन्य सामान ही जप्त केले आहे.

दरम्यान, नुकत्याच मुंबई पोलिसांनी विमानतळाच्या जवळ असलेल्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर छापा टाकला होता. तेथील पार्टीत कोरोनाच्या नियमांचे उल्लंन केले जात असल्याचे दिसून आल्याने 35 जणांवर गुन्हा दाखल केला होता. या पार्टीत क्रिकेटपटू सुरेश रैना, सुसान खान यांचा ही त्या पार्टीत समावेश होता.(Kalyan Sex Racket Busted: कल्याण येथील सेक्स रॅकेटचा पदार्फाश; 4 बांगलादेशी महिलांना अटक)

तर राज्य सरकारने इंग्लंडसह विविध देशांमध्ये कोरोनाच्या नव्या रुपामुळे रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचार बंदी लागू केली आहे. त्यातच अशा पार्ट्यांचे आयोजन केले जात असल्याने पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. तर ख्रिसमस आणि नवं वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या जल्लोषात विविध रेस्टॉरंट, बार मध्ये जंगी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. परंतु आता कोरोनामुळे या सर्वांना आपले उद्योगधंदे 11 वाजताच बंद करावे अशा सूचना दिल्या आहेत.