Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईतील (Mumbai) जोगेश्वरी (Joeshwari) रेल्वेस्थानकात एका 24 वर्षीय महिलेने आपल्या बाळासह लोकसमोर उडी घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र या प्रकरणी महिलेचा जागीच मृत्यू झाला असून बाळ सुदैवाने बचावले आहे.

गायत्री जयस्वाल अशी महिलेचे नाव आहे. तर गायत्री हिचा नवरा हा पेक्षाने रिक्षाचालक आहे. परंतु आत्महत्या करण्यासाठी गायत्री हिने लोकलसमोर बाळासह उडी टाकली. मात्र या दोघांमध्ये होत असलेल्या वादामुळे गायत्रीने ही टोकाची भुमिका घेतली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.(मुंबईत परदेशी महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक)

जोगेश्वरी स्थानकात 19 मे रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास गायत्रीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर रेल्वेस्थानकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व धक्कादायक प्रकार कैद झाला आहे.