मुंबईत परदेशी महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

मुंबई: मुंबई पोलिसांनी कुलाबा (coloba)  परिसरातुन पद्माकर नांदेकर (Padmakar Nandekar)  या स्थानिक तरुणाला अटक केली आहे, एका विदेशी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप पद्माकर वर करण्यात आला होता पीडित महिलेने कफ परेड (Cuff Parade) पोलीस स्थानकात केलेल्या तक्रारी नंतर पोलिसांनी केलेल्या तपासात पद्माकर दोषी सिद्ध झाल्याने त्याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. यासंदर्भांत तपास केल्यावर ही महिला ब्राझीलची (Brazil)  मूळ रहिवाशी असून ती काही दिवसांपूर्वी मुंबईत पर्यटनासाठी आली असल्याची माहिती  समोर येत आहे. बलात्कार झाल्यावर या महिलेने  सरळ कफ परेड पोलिसांकडे धाव घेत आपली तक्रार नोंदवली होती.

मुंबईत पर्यटक म्हणून आलेल्या  या महिलेची पद्माकर नावाच्या स्थानिक तरुणासोबत मैत्री झाली होती, मुंबई फिरण्यासाठी सोबत देण्याचे सांगून पद्माक ने तिचा विश्वास मिळवला व संधी मिळताच तिचा गैरफायदा उचलून या महिलेवर बलात्कार केल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर येत आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या महिलेने केलेली तक्रार खरी असल्याचे समोर आल्यावर पद्माकर ला अटक करण्यात आली आहे. विरार: मित्राला झाडाला बांधून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी एक आरोपी अटकेत

हा प्रकार संवेदनशील असल्याने अधिक माहिती उघड करायला पोलिसांनी नकार दिला आहे. पोलिसांचा सखोल तपास झाल्यावरच यातील सविस्तर माहिती हाती येऊ शकते.दरम्यान या सारखेच अनेक प्रकार यापूर्वीही मुंबई व अन्य शहरांमध्ये पाहायला मिळाले होते. वारंवार घडणाऱ्या बलात्काराच्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उभा राहिला आहे इतकंच नाही तर सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटनावर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता टाळता येणार नाही.