मुंबईतील धोकादायक पुल नागरिक आणि वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कारण या धोकादायक पुलांची पुर्नबांधणी आणि दुरुस्तीची कामे सुरु करण्यात आलेली आहेत. मात्र तज्ञांनी पुलांबाबत काय दुरुस्तीची कामे केली आहेत याबाबत माहिती सादर करण्यास सांगितली आहे. तर मुंबई उच्च न्यायालाने (High Court) महापालिकेला (BMC) याबद्दल निर्देशन सुद्धा दिले आहे. पुढील चार आठवड्यात पुलांच्या कामाबाबचा अहवाल महापालिकेला सादर करण्यास सांगितला आहे.
महापालिकेने पुलांसबंधित करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटवर अवलंबून राहू नये असे ही सांगण्यात आले आहे. त्याचसोबत मुंबई आयआयटी आणि व्हिजेटिआय यांच्याकडून पुलांच्या देखभालासाठी सल्ला घेण्याचे निर्देशन उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहे. मुंबईतील पुलांची महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केलेली आकडेवारीबाबत एबीपी माझा यांनी अधिक माहिती दिली आहे.(मुंबई: ग्रॅन्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील पूल जड वाहनांसाठी बंद ; पश्चिम रेल्वेचा निर्णय)
मुंबईतील पुलांची महापालिकेकडून देण्यात आलेली आकडेवारी पुढील प्रमाणे:
>> मुंबईतील एकूण पूलांची संख्या- 244
>>स्ट्रक्चर ऑडिट केलेले पूल- 296
>>उत्तम स्थितीमधील पूल-110
>>किरकोळ दुरुस्तीची गरज असलेले पूल-107
>>मोठी दुरुस्तीची कामे असलेले पूल-61
>>अत्यंत धोकादायक पाडण्यात आलेले पूल-18
तर काही महिन्यांपूर्वी सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील हिमाल पूल कोसळून काही नागरिकांचा मृत्यू झाला होता. तसेच 31 जण गंभीर झाले होते. या दुर्घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तसेच हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते शकिल अहमद यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी अद्याप सुरुच आहे.