प्रतिकात्मtक फोटो (Photo Credits-Facebook)

मुंबईतील काही ठिकाणी अद्याप ब्रिटिश कालीन पूल असून त्यावरुन वाहतूकीची सोय करण्यात आली आहे. परंतु पश्चिम रेल्वेने आता ब्रिटिश कालीन उभारण्यात आलेला ग्रॅन्ट रोडवरील (Grant Road) पूल अवजड वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला आहे. कारण या  पूलावर अवजड वाहनांचे वजन पेलवले जात नसल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ग्रॅन्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील पूल  1921 मध्ये उभारण्यात आले होते. मात्र त्यांचे आता पुर्नबांधणी करण्याची गरज असल्याचे हे सांगण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेचे प्रवक्ते अधिकारी रविंद्र भाटकर यांनी असे म्हटले आहे की, आयआयटी बॉम्बे यांनी या पुलांचे ऑडिट केले आहे. या ऑडिटनंतर मुंबईतील उपनगरीय पूलांचे पुन्हा एकदा बांधकाम करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यामधील एक ग्रॅन्ट रोडवरील पूल आहे. त्यामुळे या पूलावरुन ट्रक किंवा बस सारख्या अवडज वाहनांना बंदी घालावी असे सुद्धा आयआयटी बॉम्बे कडून पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. तर पोलिस आणि महापालिकेच्या मदतीने अवजड वाहनांना पूलाच्या बाजूने जाण्यास जागा उपलब्ध करुन देऊ असे ही सांगण्यात आले आहे.(मुंबईतील 29 धोकादायक पूल महापालिका पाडणार, नागरिकांची कोंडी होणार)

याबाबत मुंबई महापालिकेला अर्जाद्वारे अधिक माहिती देण्यात आली आहे. तसेच महापालिकेसोबत पुलाच्या पुर्नबांधणीबाबत बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. रोड ओव्हर ब्रिज बाबत अधिक काळजी घेतली जात आहे. कारण अंधेरी येथील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमवाला लागला होता. तसेच लोअर परेल येथील सुद्धा पूल धोकादायक असल्याचे आयआयटी बॉम्बे कडून सांगण्यात आले आहे. रोड ओव्हर ब्रिज हे मुंबईतील मध्य रेल्वेतील भायखळा, चिंचपोकळी, करी रोड आणि घाटकोपर येथे असून ते सुद्धा धोकादायक आहेत.