प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

मुंबईत सध्या सोन्याचे दर 40 हजार रुपयांचा आतमध्ये सुरु आहे. मात्र तरीही ग्राहक सोने खरेदी करत आहेत. परंतु येत्या काही दिवसात सोन्याचे दर तब्बल 50 हजार रुपयांचा टप्पा गाठणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत गोल्ड काउन्सिलने सोन्याच्या वाढत्या दराबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

प्रति औंस सोन्याचा दर 2 हजार डॉलर्सवर पोहचणार आहे. तर 10 ग्रॅम सोन्यासाठी जवळजवळ 39 ते 40 हजार रुपयांच्या दरम्यान ग्राहकांना पैसे मोजावे लागत आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच सोन्याचे दर 1 लाख 8 हजार 500 रुपये प्रति ग्रॅम 3 हजार 827 रुपये आहेत. मात्र हे दर प्रति 2 औंस हजार झाल्यास सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ होणार आहे.(सोन्याच्या दरामध्ये आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक वाढ)

देशात सध्या आर्थिक मंदीची स्थिती आहे. तरीही लोक सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. तसेच सोन्यात केलेली गुंतवणूक ही गुंतवणूकदारांसाठी योग्य पर्याय वाटत आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सोन्याकडे ग्राहक आकर्षित होत आहेत.