घाटकोपर येथे गाडीला जाण्यासाठी जागा न दिल्याच्या रागातून तरुणाची हत्या
Representative Image (Photo credits: File Photo)

मुंबईतील (Mumbai) घाटकोपर (Ghatkopar) येथे एका तरुणाने दुसऱ्या गाडीला जाण्यासाठी जागा न दिल्याने तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपींनी पळ काढला आहे.

साईनाथ नगर येथे घटना घडली असून गणेश म्हस्के असे तरुणाचे नाव आहे. काल रात्री चारचाकी गाडीतून काहीजण येत होते. त्यावेळी गणेश आणि गाडीतील व्यक्ती यांच्यामध्ये वादावादी झाली. तर गाडीतील चार जणांनी गणेश ह्याला मारहाण केली. तसेच मारहाण केल्यानंतर त्याला जवळच्या एका नाल्यात ढकलून देण्यात आले.(नाशिक: तरुण-तरुणींच्या गटात 'फ्री स्टाईल' हाणामारी; सिडको कॉलेज परिसरातील घटना सीसीटीव्हीत कैद)

या प्रकरणी गणेश याचा मृत्यू झाला आहे. तर पोलिसांनी घडलेल्या प्रकाराचा गुन्हा दाखल करुन घेतला असून आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे. तसेच त्यामधील दोन आरोपींच्या गाड्या ताब्यात घेतल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.