नाशिक: तरुण-तरुणींच्या गटात 'फ्री स्टाईल' हाणामारी; सिडको कॉलेज परिसरातील घटना सीसीटीव्हीत कैद
Freestyle Clash | (Photo credit: archived, edited, symbolic images)

नाशिक (Nashik) शहरात असलेल्या सिडको कॉलेज (CIDCO College Nashik) परिसरात टवाळकी करणाऱ्या तरुण-तरुणींच्या डोळक्यात तब्बल अर्धा ते पाऊणतास जोरदार हाणामारी झाली. या मारहाणीत तरुणींचा सहभाग उल्लेखनिय होता. परिसरातील नागरिकांनी हा प्रकार जवळून पाहिला. तसेच, हा घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान, या घटनेबाबात पोलिसांनी मात्र कानावर हात ठेवले असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

सिडको कॉलेजबाहेर टवाळक्या करणाऱ्या मुला-मुलींचे गट

प्राप्त माहितीनुसार, नाशिकमधील सिडको कॉलेज परिसरात काही टवाळक्या करणाऱ्या तरुणांचे गट आहेत. या गटातील तरुण हे कॉलेजचे विद्यार्थी आहेत किंवा नाहीत याबाबत माहिती सध्या उपलब्ध नाही. परंतू, कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या गटात जर काही मतभेद अथवा भांडण झाले. तर, कॉलेजमधील विद्यार्थी या टवाळक्या करणाऱ्या गटांची मदत घेतात. यापूर्वीही एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले हे गट एकमेकांपूढे आले आहेत. त्यांच्यात शाब्दीक चकमकी आणि काही प्रसंग धक्काबुक्कीचेही प्रकार घडले आहेत. दरम्यान, आज घडलेला प्रकार हा धक्कादायक होता.

टवाळक्या करणाऱ्या गटात मुलींचा सहभाग चिंताजनक

दरम्यान, कॉलेजबाहेर टवाळकी करणाऱ्या मुलांच्या गटांमध्ये आता मुलांचाही सहभाग दिसत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत कॉलेजमध्ये टवाळकी करताना केवळ मुलांचे गट दिसायचे. आता त्यात मुलींचाही सहभाग पाहायला मिळत आहे. आजच्या हाणामारिच्या घटनेतही मुलींचा प्रत्यक्ष सहभाग पाहायला मिळाल्याचे वृत्त टीव्ही 9 या वृत्तवाहिणीने दिले आहे. (हेही वाचा, राजकीय वादातून कोल्हापूर जिल्ह्यात हाणामारी; तलवारीच्या वारांत आठ जण जखमी)

नागरिकांच्या दबावानंतर पोलीस करताहेत तपास

दरम्यान, या प्रकाराबाबत प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देत कानावर हात ठेवले. मात्र, स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेतल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केल्याचे समजते.