सार्वजनिक गणपती विसर्जनाची (Mumbai Ganpati Visarjan ) तयारी पूर्ण झाली असून आज गणपती बाप्पा भक्तांचा निरोप घेणार आहेत. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले असून नागरिकांच्या सोईसाठी वाहतूक मार्गात बदल (Mumbai Ganpati Visarjan Traffic Changes) करण्यात आला आहे. त्यातच हवामान विभागाकडून पर्जन्यवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी होणारी गर्दी आणि पावसात होणारी वाहतूक कोंडी यातून मार्ग काढण्यासाठी मुंबई पोलीस प्रयत्नांची पराकष्टा करताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात मोठे बदल केले आहेत. तुम्ही जर मुंबईकर असाल किंवा काही कारणांनी मुंबई शहरात आला असाल आणि तुम्हाला वाहतूक कोंडीचा सामना करायचा नसेल तर हा बदल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
मुंबईतील वाहतूक मार्गात बदल हा गणपती विसर्जनामुळे करण्यात आला आहे. गणपती विसर्जन संपल्यानंतर हे वाहतूक मार्ग पूर्ववत करण्यात येतात. मुंबतील विविध मार्गांमध्ये हे बदल करण्यात येतात. हे बदल पाहण्यासाठी आपण मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. गणपती विसर्जन हा गणेशोत्सव काळातील सर्वात महत्त्वाचा आणि अंतिम दिवस असतो. त्यामुळे सार्वजनिक गणपती आणि घरगुती गणपतींचेही विसर्जन होते. परिणामी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्याचा परिणाम वाहतूक आणि पोलीस यंत्रणांवर पडतो. हा ताण कमी करण्यासाठी मग वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला जातो.
गणपती विसर्जनादिवशी मुंबईतील सर्व रस्ते, चौपटी येथे सर्वाधिक गर्दी असते. त्याचा परिणाम मुंबई पोलिसांच्या सुट्ट्यांवरही होतो. प्राप्त माहितीनुसार, मुंबईतील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांना विविध ठिकाणी कर्तव्यावर तैनात करण्यात आले आहे. खास करुन गणपती विसर्जन आणि त्यालाच लागून आलेल्या ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्विट
आज दिनांक २८-०९-२०२३ रोजी लालबाग, काळाचौकी परिसरामध्ये अनेक मंडळाचे गणपती विसर्जनाकरिता बाहेर पडणार असून यावेळी त्यांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जनतेस होणारी गैरसोय टाळण्यासाठी खालील वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. #वाहतूक_व्यवस्था pic.twitter.com/BaiPIIHo1c
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) September 28, 2023
शेवटी, महाराष्ट्रातील गणेश विसर्जन हे श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक उत्सव यांचे गहन मिश्रण आहे. आपल्या काळातील विकसित होत असलेल्या पर्यावरणीय जाणीवेशी जुळवून घेत ते भक्तीच्या भावनेला मूर्त रूप देते. हा जोमदार उत्सव सतत भरभराटीला येत असल्याने, तो भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या लवचिकता आणि अनुकूलतेची एक शक्तिशाली आठवण म्हणून काम करतो.