Representational Image (Photo credits: PTI)

मुंबईत विवध कंपन्यांच्या माध्यमातून नागरिकांना वीजेचा पुरवठा केला जातो. मात्र येणाऱ्या पुढील काही वर्षात वीज दरवाढीचा फटका मुंबईकरांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खासकरुन अदानी आणि बेस्ट वीज दरात वाढ होऊ शकते. वीज वहनाचे शुल्क वसुल करण्याबाबत एक याचिका महापारेषण कंपनीने राज्य नियमक आयोगाकडे केली आहे. दाखल करण्यात आलेल्या याचिकेत वीज दरवाढी बाब मुद्दा उपस्थितीत करण्यात आला आहे.

राज्यात विविध ठिकाणी वीजेचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो. मात्र मुंबईत बहुतांश प्रमाणात बेस्ट आणि अदानी कंपन्यांच्या माध्यमातून वीज पुरवठा नागरिकांना करण्यात येतो. त्याचसोबत रेल्वे मंडळाकडून त्यांचा स्वतंत्रपणे विजेचा पुरवठा करण्यात येतो. पण सर्व कंपन्या वीज पुरवठा करण्यासाठी महापारेषण कंपनीच्या सुविधेचा वापर करतात. त्यानुसार महापारेषण यांच्याकडून या कंपन्यांकडून वार्षिक शुल्क वसूल केला जातो. तर आता महापारेषण यांनी 2020-21 ते 2014-25 या पाच वर्षांसाठी शुल्काची रक्कम निश्चित करण्यासाठी आयोगाकडे याचिका दाखल केली असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती महाराष्ट्र टाइम्स यांनी दिली आहे.(पुणे: कागदी पिशवीसाठी 8 रुपये आकारल्याने ग्राहक मंचाने ठोठावला 25 हजारांचा दंड)

तर काही महिन्यांपूर्वी सर्वसामान्य आयुष्य जगत असलेल्या एका गरीब नागरिकाच्या राहत्या घराचे वीजबील चक्क 128 कोटी 45 लाख 95 हजार 444 रुपये इतके आले आहे. उत्तर प्रदेश राज्यातील हापूड जिल्ह्यातील चमरी गावचे रहिवासी शमीम यांच्यासोबत हा प्रकार घडला होता. त्यावेळी संपूर्ण वीज बील भरल्याशिवाय आपला खंडीत केलेला वीजपूरवठा पूर्ववत केला जाणार नसल्याचे वीज वितरण कार्यालयाने या ग्राहकाला सांगितले होते.