Wildlife Smuggling Crackdown: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( CSMI Airport) मुंबई सीमाशुल्क (Mumbai Customs) अधिकाऱ्यांनी वन्यजीव तस्करीविरोधात एक मोठी कारवाई केली. कारवाईत पाच सियामंग गिब्बन्स (Siamang Gibbons) ज्याला सिम्फॅलँगस सिंडॅक्टिलस (Symphalangus Syndactylus) म्हणूनही ओळखले जाते, अशा या दुर्मिळ प्रजाती म्हणून गणल्या जाणाऱ्या वन्य जीवाची भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. मूळचे आग्नेय आशियातील असले हे दुर्मिळ नरवानर, एका प्रवाशाने ट्रॉली बॅगमध्ये प्लास्टिक बॉक्स आणि पिंजऱ्यांमध्ये लपवलेले आढळले. भारतात त्यांचे बेकायदेशीर हस्तांतरण करण्याचा तस्कराचा डाव होता. मात्र, सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी वेळीच कारवाई केल्याने आरोपींचा डाव उधळला गेला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीुसार, 4 आणि 5 फेब्रुवारी 2025 च्या रात्री त्री क्वालालंपूरहून येणाऱ्या एका प्रवाशाला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी रोखले तेव्हा त्याच्यामार्फत वन्य प्राण्यांची तस्करी सुरु असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
वन्य प्राण्यांची अवैध वाहतूक
आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु असलेली वन्य प्राण्यांची तस्करी रॅकेटमधील कारी तस्कर भारता प्रवेश करत असल्याची आणि त्यांच्याकडे काही दुर्मिळ प्रजातीचे वन्य प्राणी असल्याची गुप्त माहिती सीएसएमआय विमानतळावरील सीमाशूल्क अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे सीमाशुल्कचे अधिकारी आगोदरच सतर्क होते. त्यांनी नियमीत तपासणीच्या आधारे सियामांग गिबन्स (सिम्फॅलँगस सिंडॅक्टिलस) प्राण्याची अवैध वाहतूक करणाऱ्या व्यक्तीस शोधून काढले. आरोपीकडे आढळलेली ही प्रजाती धोक्यात असलेल्या प्रजातींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अधिवेशनाच्या परिशिष्ट I आणि वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या अनुसूची IV अंतर्गत सूचीबद्ध आहे. (हेही वाचा, Mumbai Crime: मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई, केनियन नागरिकाकडून 4 कोटींहून अधिक किमतीचे कोकेन जप्त.)
सियामांग गिबन्स एक दुर्मिळ प्रजाती
गिबन प्रजातींपैकी सर्वात मोठा सियामांग गिबन हा एक वृक्षाच्छादित, काळ्या केसांचा प्राणी आहे. जो इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडच्या जंगलात आढळतो. त्यांच्या धोक्यात असलेल्या प्रजातीमुळे आंतरराष्ट्रीय वन्यजीव संवर्धन कायद्यांतर्गत त्यांचा व्यापार अत्यंत प्रतिबंधित आहे.
कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशाने दुर्मिळ प्राण्याची वाहतूक करताना ते लपविण्यासा अत्यंत कल्पकतेचा वापर करेला होता. त्यासाठी त्याने प्रवासी ट्रॉलीमध्येच खास पिंजरे बनवले होते. पण, तरीदेखील तो सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या तावडीतून सुटू शकला नाही. सुटका केलेल्या प्राण्यांची तातडीने काळजी घेण्यात आली आहे आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या सुरक्षित मायदेशी परत पाठवण्यासाठी समन्वय साधला आहे.
सियामांग गिबन्स यशस्वी सुटका झाल्यानंतर या प्रवाशाला पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो (WCCB) कडे सोपवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, सुटका केलेल्या गिबन्सना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यांची सुरक्षितता आणि आंतरराष्ट्रीय संवर्धन कायद्यांचे पालन सुनिश्चित करणे यांवर देखील कार्यवाही सुरु आहे.