CSMT रेल्वे स्थानकात बफरला धडक दिलेल्या मोटरमनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तर मुंबईत जीटीबी नगर येथे राहत होते.
लोकमतने याबद्दल अधिक माहिती दिली असून पंकज गुलाबचंद इंदोरा असे मोटरमन यांचे नाव आहे. तर मुंबई सीएसएमटी स्थानकामध्ये (CSMT Station) 26 एप्रिलला बेलापूर-सीएसएमटी लोकल (Belapur - CSMT Local) ट्रेन बफरला धडकल्याने काही काळी हार्बर रेल्वे (Harbour Line) विस्कळीत झाली होती. मात्र या दुर्घटनेत कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. या प्रकरणी इंदोरा यांची चौकशी सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. परंतु एका आठवड्याच्या आतमध्ये त्यांचा मृत्यू झाला.(मुंबई: सीएसएमटी स्थानकामध्ये बफर वर धडकली ट्रेन)
प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर बेलापूरहून आलेल्या लोकलचे अंतिम स्थानक सीएसएमटी होते. धीम्या गतीमध्ये असलेली ही लोकल बफरला धडकली. दरम्यान मोटारमॅनने तातडीने इमरजंसी ब्रेक दाबल्याने प्रवाशांना अचानक झटका बसला परंतू सारे प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली होती.