Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबई सीएसएमटी स्थानकामध्ये (CSMT Station) आज बेलापूर-सीएसएमटी लोकल (Belapur - CSMT Local) ट्रेन बफरला धडकल्याने काही काळी हार्बर रेल्वे ( Harbour Line) विस्कळीत झाली होती. मात्र काही वेळाने ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. हा प्रकार सकाळी 11.30 च्या सुमारास झाला होता. प्लॅटफॉर्मनंबर 1 वर आलेली लोकल बफरला धडकली मात्र सुदैवाने कोणताच अनुचित प्रकार झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी पेंटाग्राफवर बेल्ट फेकल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत झाली होती.

प्रवासी सुखरूप

प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर बेलापूरहून आलेल्या लोकलचे अंतिम स्थानक सीएसएमटी होते. धीम्या गतीमध्ये असलेली ही लोकल बफरला धडकली. दरम्यान मोटारमॅनने तातडीने इमरजंसी ब्रेक दाबल्याने प्रवाशांना अचानक झटका बसला परंतू सारे प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 अपघाताची दृश्य 

ट्रेन बफरला धडकल्यानंतर काही काळ सेवा खंडीत झाली होती. मात्र थोड्याच वेळात वाहतूक पुन्हा सुरू करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं आहे. दरम्यान सध्या वेळापत्रक कोलमडलं असलं तरीही वाहतूक सुरू आहे.

2015 साली चर्चगेट स्थानकावरही अशाच प्रकारे ट्रेन बफरला धडकल्याने पहिला डब्बा काही फूट वर चढला होता.