Sexual harassment Representational Image | Rape | (Photo Credits: PTI)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात देखील अत्याचाऱ्याच्या घटनेत चांगलीच वाढ झाली आहे.  पोलीस अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळत आहे. पुन्हा एकदा मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या टॅक्सीमध्ये 14 वर्षीय गतीमंद मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीचे दादर येथून अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर धावत्या टॅक्सीमध्ये बलात्कार केला. अत्याचारानंतर आरोपींनी मुलीला मालाडच्या मालवणी परिसरात सोडून देण्यात आले.  (हेही वाचा -Jalgaon Crime News: दारूच्या नशेत पत्नीची हत्या, संशयित पती पोलिसांच्या ताब्यात)

याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपींवर बलात्कार आणि बाल लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सलमान शेख आणि टॅक्सी चालक प्रकाश पांडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान मुंबईचे गुन्हेगारीचे प्रमाण हे  तुलनेत हे प्रमाण अन्य शहरांच्या चारपटीने जास्त आहे. मुंबईनंतर दुसरा क्रमांक पुणे शहराचा आहे. पुण्यात गेल्या 8 महिन्यांत विनयभंग/अश्लील वर्तनाच्या 364 घटना घडल्या आहेत. यामध्ये 124 घटना बलात्काराच्या असून तसे गुन्हे देखील दाखल झाले आहेत. महिला अत्याचाराच्या घटनेत तिसऱ्या क्रमांकावर नागपूर असून गेल्या 8 महिन्यांत नागपुरात 304 महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत.