Jalgaon Crime News: दारूच्या नशेत पत्नीची हत्या, संशयित पती पोलिसांच्या ताब्यात
Crime (PC- File Image)

जळगावातील भुसावळ (Bhusawal) तालुक्यातील हतनूर येथील शेतशिवारात वास्तव्यास असलेल्या पती- पत्नीमध्ये वाद होत होते. दरम्यान सोमवारी दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या (Crime News) केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. यामुळे घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वरणगाव पोलिसांनी पतीला अटक केली आहे.  उत्तरप्रदेश राज्यातील राजकिशन कॉलनी शक्तीनगर येथील जितेंद्र गंगाराम हेमब्रम व शांताबाई हे दाम्पत्य आहे. ते एका शेतकऱ्याकडे कामाला असल्याने जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर येथील शेतशिवारात जितेंद्र हेमब्रम हा पत्नी शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम सोबत या ठिकाणी वास्तव्यास होते.  (हेही वाचा - Pune: पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत! 17 वर्षीय तरुणाची हत्या; हडपसर येथील घटना, आरोपींना अटक)

शेतातील घरात हे दांपत्य राहात असून, या दोघांमध्ये रात्री वाद झाला. या वादावेळी पती जितेंद्र याने दारूच्या नशेत पत्नी शांतादेवी हिला लाथाबुक्यांनी मारहाण करून तिचा गळा आवळल्याने शांतीदेवी हिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती वरणगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे साक्षीदार व मृत शांतादेवी यांनी संशयित पतीची दारू पिल्याने त्याचा पतीला राग आल्याच्या कारणावरून घटना घडल्याचे समोर आले आहे.